नवी दिल्ली : निवडणुक रोख्यांची (इलेक्टोरल बाँड्स – योजना ही घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्वाळा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीतील काळा पैशांचा वापर रोखण्यासाठी इलेक्टोरल बाँड्स हा एकमेव मार्ग नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.त्याशिवाय, आता निवडणूक …
Read More »मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत पुन्हा आंदोलनाचा इशारा
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे. सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसागणिक खालवत आहे. पण, बुधवारी जरांगे यांची तब्येत खालावली त्यामुळे …
Read More »विश्वकर्मा सेवा संघ महिला मंडळचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात
बेळगांव : रविवार दिनांक 11/2/2024 रोजी श्री विश्वकर्मा सेवा संघ महिला मंडळाने आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांची उस्फुर्त साथ मिळाली. उपस्थित मान्यवर मीनाताई बेनके आणि विश्वकर्मा समाजाच्या सावंत मॅडम या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर मीनाताई बेनके …
Read More »जागतिक बँकेच्या पथकाने केली कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरप्रवण भागाची पाहणी
कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याला जागतिक बँकेकडून निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने जिल्ह्यातील पूरप्रवण भागाची पाहणी केली. या पथकात जोलांथा क्रिस्पीन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, सविनय ग्रोव्हर यांचा समावेश होता. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा …
Read More »संजय पाटील यांना लोकसभेचे तिकीट देण्याची मराठा समाजाची मागणी
बेळगाव : बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते असल्याने त्यांनाच यावेळच्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी ग्रामीणमधील मराठा समाजाने केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मराठा समाजाची बैठक आज कॅम्पमधील गंगाधर शानभाग हॉलमध्ये पार पडली. या बैठकीत माजी आमदार …
Read More »खानापूर तालुका समितीची शुक्रवारी बैठक
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अंगणवाडी भरतीमध्ये मराठी उमेदवारांच्या वर अन्याय झाला असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आले आहे. या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी विचारविनिमय …
Read More »जैन धर्मियांसाठी स्वतंत्र महामंडळ करा
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्यात जैन धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राज्य सरकारने ज्याप्रमाणे विविध जातीधर्मांसाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन केली आहेत त्याच धर्तीवर जैन धर्मियांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली. …
Read More »अतुल शिरोले यांना भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ‘अ’ श्रेणी प्राप्त
बेळगाव : बेळगाव येथील अतुल सुरेश शिरोले यांनी भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात येणारा कोचिंग कोर्स पूर्ण केला असून त्यांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पैलवान म्हणून कुस्तीचे मैदान गाजवणारे अतुल शिरोले आता कुस्ती प्रशिक्षक म्हणून मैदानावर उतरणार आहेत. पंजाबमधील पटीयाला येथे नेताजी सुभाष चंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ …
Read More »रथसप्तमी निमित्त क्रीडा भारतीतर्फे सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूलच्या मैदानावर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही क्रीडा भारती बेळगाव व पतंजली योग शिबिर यांच्यातर्फे शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता रथसप्तमी निमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्राथमिक व माध्यमिक शालेय मुले- मुली, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी, योग वर्ग शारीरिक …
Read More »…म्हणे बेळगावमधील मराठी भाषिक कर्नाटकचेच!
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे परत महाराष्ट्र एकीकरण समितीवर तोंड सुख घेत कानडी लोकांची वाहवा मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. कर्नाटक प्रदेश काँगेस कमिटी कार्यालयाच्या समोर “समितीचे लोक सीमाभागातील मराठी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र हद्दीत कार्यालय सुरू करण्याची मागणी केली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta