Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक विधींची टिंगल केल्याप्रकरणी पोलीस तक्रार

कठोर कारवाईची हिंदु संघटनांची मागणी कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात हिंदू धर्मातील कन्यादान विधी, त्यांतील मंत्र आणि पुरोहितवर्ग यांचा अपमान केला. तसेच उपस्थितांना ‘या विधींच्या माध्यमातून बहुजन समाजाला फसवले जात आहे’ असे वक्तव्यही केले. त्यांनी या भाषणातून एका समाज घटकाच्या विरोधात जातीय तेढ निर्माण …

Read More »

एपीएमसी पोलीस ठाण्याला मुस्लिम नेत्यांचा घेराव घालून निदर्शने

बेळगाव : बेळगावातील एपीएमसी पोलीस ठाण्याला मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी शुक्रवारी अचानक घेराव घालून पोलिसांच्या उपद्रवाचा निषेध केला. काळ, गुरुवारी रात्री काही पोलिसांनी आझमनगर मुख्य रस्त्यावर दादागिरी करत उर्मटपणे अश्लील शिवीगाळ करत छोटीछोटी दुकाने बंद करायला भाग पाडले. समाजसेवक इम्रान फत्तेखान यांनी त्याचा जाब विचारल्यावर त्यांनाही पोलिसांनी शिवीगाळ केली. या घटनेच्या …

Read More »

हुबळी दंगल प्रकरण : सरकारने पुरुषार्थ दाखवावा : प्रमोद मुतालिक यांची सरकारला टोला

हुबळी : हुबळी दंगल पूर्वनियोजित कट होता. हिंदू समाजाला घाबरविण्याच्या उद्देशाने हुबळी येथील गोंधळाला दंगलीचे स्वरूप देण्यात आले. सरकारने याप्रकरणी दंगलखोरांसंदर्भात पुरुषार्थ दाखवावा, असा टोला श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी लगावला. जुन्या हुबळी येथील दंगलीतील दिड्डी हनुमंत देवस्थान आणि पोलीस स्थानकाला आज प्रमोद मुतालिक यांनी भेट दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी …

Read More »

राज्यात बारावीच्या परीक्षांना प्रारंभ; बेळगाव जिल्ह्यात 90 केंद्रांत परीक्षा

बेळगाव : राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. परीक्षा सुरू झाल्याबद्दल विद्यार्थीही खूप उत्सुक दिसून येत होते. बेळगाव जिल्ह्यात पीयूसी परीक्षेसाठी एकूण 51,853 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात एकूण 90 केंद्रांत परीक्षा सुरू आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 24,046, चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 27,807 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदणी केली आहे. जिल्हा कोषागारातुन …

Read More »

बेळगावात 24 एप्रिलला आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान

बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या 24 एप्रिल रोजी भारत, इराण आणि जॉर्जिया या आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून हे मैदान यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. कोल्हापूरच्या खासबाग मैदान आखाड्यानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नामवंत आखाडा म्हणजे बेळगावचा आनंदवाडी आखाडा होय. या आखाड्याची आसन …

Read More »

वायव्य शिक्षक निवडणूकीसाठी प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी

                बेळगाव : कर्नाटकातील वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश हुक्केरी यांच्या नांवाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी नवी दिल्ली येथे ही घोषणा केली. प्रकाश हुक्केरी हे ज्येष्ठ राजकीय …

Read More »

भाजपला 10 गुंठे जागा महापालिकेकडून मंजूर

बेळगाव : बेळगाव शहरातील धर्मनाथ सर्कल जवळील तब्बल 10 गुंठे जागा 77,62,500 रुपये किंमतीमध्ये भारतीय जनता पक्षाला देण्यात आली आहे. महानगरपालिकेने आपल्या मालकीची ही जागा भाजपचे कार्यालय बांधण्यासाठी दिली असून गेल्या 3 मार्च 2022 रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावे याबाबतचा दस्त झाला आहे. बेळगाव महापालिकेची धर्मनाथ सर्कल जवळील सीटीएस क्र. …

Read More »

हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा रविवारी

बेळगाव : हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा रविवारी (ता. 24) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हलशी येथे मराठी शाळेची स्थापना करण्यात आली होती. तेंव्हापासून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे …

Read More »

मंगळुरू येथे मशिदीच्या डागडुजीदरम्यान सापडले मंदिराचे अवशेष!

प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन मंगळुरू : कर्नाटकमधील मंगळुरु येथील एका मशिदीच्या डागडुजीच्या कामाकाजाच्या वेळी मशिदीखाली हिंदू मंदिर सदृश्य असे काही अवशेष सापडले आहेत. मंगळुरुपासून काही अंतरावर असणार्‍या या मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याची बातमी वार्‍यासारखी परसरली असून हा सारा प्रकार गुरुवारी समोर आल्याची माहिती एनआय या वृत्तसंस्थेने दिली. मिलाली येथील जुमा …

Read More »

जम्मूमध्ये भीषण चकमक; 4 दहशतवादी ठार, तर 1 जवान शहीद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या एक दिवस अगोदरच जम्मूमध्ये सुरक्षा आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले की, गोळीबारामध्ये एक सुरक्षा अधिकारी शहीद झाले आहेत. तर, 4 अधिकारी जखमी झालेली आहेत. तर या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मूमधील चढ्ढा कँप परिसरात शुक्रवारी सकाळी …

Read More »