Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

28 नोव्हेंबरच्या चाबूक मोर्चासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : रिंगरोड विरोधात शेतकऱ्यांचा भव्य चाबूक मोर्चा 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. काळ्या आईला वाचविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव शहर परिसरातून रिंगरोड करण्यात येणार आहे.यामध्ये अनेक एकर सुपीक जमीन या रिंगरोडमध्ये जाणार असल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार …

Read More »

खाणीतील पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

  बेळगाव : दोन शाळकरी विद्यार्थ्यांपैकी एकाचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जनता कॉलनी सुळगा (उ.) ता. बेळगाव येथे आज सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच काकतीचे पोलीस पोलीस निरीक्षक सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. यानंतर पोलीस आणि अग्निशमन …

Read More »

एंजल फाउंडेशनकडून विद्यार्थ्याला मदत

  बेळगाव : इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरून त्याला आर्थिक मदत देण्यात आली आहे. सदर मदत एंजल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली असून गोरगरीब आणि गरजूंना मदत करण्याचा ध्यास एंजल फाउंडेशनने घेतला आहे. याआधीही एंजल फाउंडेशनने गोरगरीब आणि गरजूंना आर्थिक मदत करून त्यांना सहकार्य केले आहे तसेच येणाऱ्या काळातही …

Read More »

वेदगंगा, दूधगंगा नदीतील थेंबही पाणी देणार नाही

राजू पोवार : सीमाभागातील संघटनांचा कोल्हापूर आंदोलनात सहभाग निपाणी (वार्ता) : सुळकुड (ता. कागल) येथून दूध गंगा नदीद्वारे इचलकरंजी येथे पाणी पुरवण्याची मोठी योजना आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होऊन पुन्हा शेतकरी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी योजनेसाठी सीमाभागातील दूधगंगा नदीतून एक …

Read More »

बोरगाव मधील ढोल वादन स्पर्धेत ढोणेवाडीचा संघ प्रथम

  उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य :१९ संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथील बिरदेव मंदिरमध्ये आयोजित ढोल वादन स्पर्धेत ढोणेवाडी येथील अक्कमहादेवी वालुग मंडळांने प्रथम क्रमांक पटकावून रोख ११ हजार १ रुपयांचे बक्षीस मिळवले. अभिनंदन पाटील यांचे चिरंजीव …

Read More »

खानापूर समितीच्या आठ सदस्यीय शिष्टमंडळाच्या दौऱ्याला 15 नोव्हेंबरपासून गर्लगुंजी येथून सुरुवात

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या विभागलेल्या दोन्ही गटात एकीच्या दृष्टीने गेल्या 9 नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे निरीक्षक म्हणून श्री. राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व इतर सदस्यांच्या शिष्टमंडळाने खानापूर येथील शिवस्मारक येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एकीची घोषणा करताना आठ सदस्यीय समिती नेमण्यात …

Read More »

खानापूर मलप्रभा क्रीडांगण सुविधांपासून वंचित; लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणाची उभारणी करून गेल्या दहा वर्षानंतरही आजतागायत मलप्रभा क्रीडांगण अनेक सुविधांपासून वंचीत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष झाले आहे. माजी आमदार कै. प्रल्हाद रोमाणी यांच्या काळात उभारणी करून जेवढी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तेवढ्याच आजपर्यंत सुविधा दिसून येत आहेत. मात्र महत्वाच्या …

Read More »

हेम्माडगा-खानापूर रस्त्याची समस्या तात्काळ सोडवा

  खानापूर : हेम्माडगा-खानापूर रस्त्यावर मणतुर्गे गावानजीक रेल्वे गेट जवळच्या रस्त्याची नुकताच डागडुजी करण्यात आली आहे. मात्र हा रस्ता करत असताना खडी ऐवजी मोठे बोल्डर वापरण्यात आले आहेत त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हेम्माडगा मार्गे गोव्याला जाणारी वाहने देखील या रस्त्यावरून ये-जा करत असतात. या मार्गे होणारी …

Read More »

गणेश दूध संकलनातर्फे गावागावांत जनजागृती करणार : उमेश देसाई

  बेळगाव : सीमाभागात काही संस्थांकडून निर्धारित दर देण्याऐवजी प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपये कमी दिले जात आहे. प्रत्येक संस्थेला दरपत्रक दिलेले असून देखील ते लावले जात नाही. दरासंदर्भात उत्पादकांना अंधारात ठेवले जात आहे. यासाठी गावागावात जनजागृती करणार असल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे प्रमुख उमेश उर्फ प्रवीण देसाई यांनी …

Read More »

आयसीसीच्या सर्वोत्तम संघात टीम इंडियाची बाजी!

  नवी दिल्ली : टी-20 वर्ल्डकप 2022 स्पर्धा ऑस्ट्रेलियात पार पाडली. मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेटनी विजय मिळवत दुसर्‍या विजेतेपदावर नाव कोरले. इंग्लंडने याआधी 2010 साली विजेतेपद मिळवले होते. अंतिम सामना झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने टी-20 वर्ल्डकप 2022च्या सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात 12 …

Read More »