मुंबई : आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज, शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच अपेक्षापेक्षा वेगळे असल्यामुळे संध्याकाळी हाती येणाऱ्या निकालांबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. माजी मंत्री अनिल देशमुख …
Read More »पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात गड्यांनी विजय
नवी दिल्ली : डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डुसेन यांनी मॅच विनिंग खेळी केली. ईशान किशनची 76 …
Read More »निडसोसी श्रींच्यावर शुभेच्छांचा वर्षाव….
संकेश्वर (महंमद मोमीन) : निगसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा ७९ वा वाढदिवस भक्तगणांनी भक्तीपूर्वक साजरा केला. निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठात बहुसंख्य भक्तगणांनी श्रींचा आर्शीवाद घेऊन शुभेच्छा प्रदान केल्या. संकेश्वर वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्रातर्फे परमपूज्य महास्वामीजींना शैक्षणिक साहित्य देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष …
Read More »कत्ती सावकार धन्यवाद…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील समस्या जाणून घेण्यासाठी नुकताच माजी खासदार रमेश कत्ती यांनी पहाणी दौरा केला. गावातील रस्त्याची दुरवस्था, गटारीत सांडपाणी तुंबून राहिलेले, गावत सगळीकडे अस्वच्छतेचे रडगाणे ऐकून रमेश कत्ती चांगलेच संतप्त झाले. त्यांनी सत्तारुढ नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली. गावातील मूलभूत समस्या सोडविण्यात नगरसेवक कमी पडल्याची खंत व्यक्त करुन …
Read More »खूषखबर… मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्रात
पुणे : तमाम महाराष्ट्रवासियांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. राज्याच्या सीमेवर गेला सुमारे आठवडाभर रुसून थबकलेला मान्सून येत्या दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे कोकणात दाखल होणार आहे; तसेच येत्या पाच दिवसांत राज्याच्या बहुतांश भागांतही पावसाच्या सरी बरसणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या पारंपरिक वेळापत्रकानुसार तो …
Read More »कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान
चंदगड : दड्डी- राजगोळी रस्त्याचे काम चालू आहे. मात्र या कामाचा फटका येथील विष्णू पाटील नामक गरीब शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे. दड्डी- राजगोळी रस्त्याचे काम सांगलीच्या शिवपार्वती कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. पावसाळ्याची अगोदर काम पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न सुरू आहे. या घाईगडबडीत उखडून काढलेल्या रस्त्यावरील टाकाऊ कचरा, माती, दगड …
Read More »देशाच्या जैव-अर्थव्यवस्थेत आठ वर्षात आठपटीने वाढ
नवी दिल्ली : देशाच्या जैव-अर्थव्यवस्थेत मागील आठ वर्षांच्या कालावधीत आठपटीने वाढ झाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘बायोटेक स्टार्टअप एक्स्पो’ चे उद्घाटन करताना केले. दोन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील बायोटेक स्टार्टअप्सनी सहभाग घेतलेला आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्व क्षेत्रांना मजबूत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. आधीच्या …
Read More »संकेश्वरात बाळू मामांच्या नावाने चांगभलं…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर मठ गल्लीतील श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ सद्गुरू संत श्री बाळूमामांंच्या बकरींचे आगमन होताच बाळूमामांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. बगा क्रमांक-१८ गडहिंग्लज औरनाळ, भडगांव मार्गे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ दाखल झाले. संकेश्वरातील भक्तगणांनी सद्गुरू बाळूमामा महाप्रसादाचे आयोजन केले होते. भक्तगणांनी बाळूमामांच्या दर्शनाबरोबर महाप्रसादाचा …
Read More »वृत्तपत्र कागदाचे दर कमी करण्याची मागणी
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण संपन्न बेळगाव : वाढत्या महागाईची झळ अन्य क्षेत्राप्रमाणे वृत्तपत्र क्षेत्रालाही बसली आहे. छपाईचे दर वाढले आहेत. त्यातच आता वृत्तपत्राला लागणाऱ्या कागदाचे दरही भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे मध्यम व लहान वृत्तपत्रे चालविणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील गावागावापर्यंत हीच वृत्तपत्रे जाऊन पोहोचतात. यामुळे ही …
Read More »एअरमन ट्रेनिंग स्कूलचे प्रमुख म्हणून एअर कमोडोर एस. श्रीधर यांची नियुक्ती
बेळगाव : सांबरा, बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलचे नूतन स्टेशन कमांडर म्हणून एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात मावळते स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन अरुण मुत्तू यांनी आपल्याकडील अधिकार पदाची सूत्रे नूतन स्टेशन कमांडर एअर कमोडोर एस. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta