Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

तीन तासाच्या परिश्रमानंतर मांजराची सुटका!

  बेळगाव : बेळगावमधील खडेबाजार येथील एका तीन मजली इमारतीच्या बाल्कनीतून जीव धोक्यात आलेल्या मांजराची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. सुमारे तीन तासांच्या परिश्रमनंतर मांजराची यशस्वी सुटका केल्यानंतर नागरिकांनी टाळ्या वाजवून अग्निशमन दलाचे अभिनंदन केले. प्रेमाने पाळलेले पाळीव मांजराचे एक पिल्लू बेळगावच्या खडेबाजार येथील तीन मजली इमारतीच्या …

Read More »

यंदाही शांतिनिकेतन सीबीएसई दहावीचा निकाल 100 टक्के

  खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही 100 टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षाही 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. नुकताच जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सलग आठ वर्षे शांतिनिकेतन पब्लिक …

Read More »

कोप्पळजवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

  कोप्पळ : कोप्पळ जिल्ह्यातील यालबुर्गा तालुक्यातील भानापुर गावात अज्ञात वाहनाने स्कॉर्पिओ वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. देवप्पा कोप्पड (62), त्यांची सून गिरिजम्मा कोप्पड (45), शांतम्मा (35), पर्वतम्मा (32), कस्तुरम्मा (20) यांचा मृत्यू झाला. हे सर्व बिन्नळ गावातील एकाच कुटुंबातील आहेत. स्कॉर्पिओमधून एकूण …

Read More »

हुबळीजवळ अग्निकांडात चौघे जळाले?

  हुबळी : भीषण अग्निकांडात चौघे होरपळून मरण पावल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. हुबळीबाहेरील तारिहाळ येथील एका खासगी कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यात चारहून अधिक कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. ही आग कशी लागली? …

Read More »

मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल

  नवी दिल्ली : आमचा लाऊडस्पीकर हा जनतेचा बुलंद आवाज आहे. कोणाला कितीही पिपाण्या वाजवू द्या. शिवसेनेचा लाऊडस्पीकर 56 वर्ष झालं सुरु आहे. महाराष्ट्र आणि देश निष्ठेनं शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राऊतांनी …

Read More »

मंकीपॉक्स ही जागतिक आरोग्य आणीबाणी, डब्ल्यूएचओची मोठी घोषणा

जीनिव्हा : कोरोनानंतर जगभरात चिंतेचा विषय ठरलेला मंकीपॉक्स हा साथरोग प्रकारातील आजार जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आला आहे. सध्या जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. त्यात यावर विस्तृत चर्चा झाली होती. अखेर सार्वजनिक …

Read More »

नीरज चोप्राने पुन्हा इतिहास रचला! जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक

  भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक ऍथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपवत रौप्यपदक पटकावलं आहे. त्याला या स्पर्धेत सुवर्णवेध घेता आला नाही मात्र त्यानं कडवी झुंज देत रौप्यपदक मिळवलं. नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं …

Read More »

स्मृती इराणी मुलीच्‍या नावावर बेकायदेशीररित्या बार चालवत असल्याचा कॉंग्रेसचा आराेप

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात बेकायदेशीररित्या बार चालवत असल्याचा धक्कादायक आरोप शनिवारी कॉंग्रेसने केला. याप्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत इराणी यांची केंद्रीय मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दरम्‍यान, इराणी यांच्या मुलीच्‍या वकिलांनी कॉंग्रेसने केलेल्या आरोपांचे खंडण केले आहे. त्यांचे वकील कीरत नागरा …

Read More »

मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर आताच चर्चा करणे अयोग्य

मल्लिकार्जून खर्गेंचा राज्यातील नेत्याना सल्ला, कॉंग्रेसच्या दोन गटातील दाव्यावर नाराजी बंगळूर :आगामी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवर चर्चा करणे योग्य नाही, त्यावर अंतिम निर्णय हायकमांडच घेईल, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी (ता. २३) सांगितले. मुख्यमंत्रीपदाबाबत कर्नाटक काँग्रेसमधील दोन गटात सुरू असलेल्या …

Read More »

राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष डॉ. शि. बा. पाटील यांचे निधन

संकेश्वर (महंमद मोमीन) : राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष, राष्ट्रप्रशस्ती प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक डॉ. शिवनगौडा बाळगौडा पाटील (वय ८१) यांचे आज सकाळी ६.१० वाजता संकेश्वर बसवान गल्लीतील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते कवी, लेखक आणि उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांची १२ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना एकलव्य प्रशस्ती, उत्तम शिक्षक राज्य …

Read More »