Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

डी. के. शिवकुमारविरुध्द ईडीकडून आरोपपत्र दाखल

मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. दिल्ली न्यायालयात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमांतर्गत फिर्यादी तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. फेडरल प्रोब …

Read More »

विधान परिषद निवडणुकीत विजय भाजपचाच : नलीनकुमार कटील

बेळगाव : राज्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांचाच विजय होईल, तसेच बेळगाव भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा विश्वास भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी व्यक्त केलाय. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार अर्ज भरण्यासाठी भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील बेळगावमध्ये आले होते. नलीनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव, विजापूर, बागलकोट …

Read More »

विधान परिषद निवडणुकीसाठी बेळगावमध्ये भाजप मेळावा

बेळगाव : राज्यात होऊ घातलेल्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना मत देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये भाजप मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता. वायव्य पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार हनुमंत निराणी आणि शिक्षक मतदारसंघाचे अरुण शहापूर यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. यानंतर …

Read More »

पुष्पहार तुझ्या गळा-माझ्या गळा…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचे नूतन नगरसेवक शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसत आहे. व्यापारी नंदू मुडशी हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. एकीकडे नंदू मुडशी यांचा सत्कार होत असताना दुसरीकडे नंदू आपल्या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे विशेष अभिनंदन करतानाचे चित्र …

Read More »

संकेश्वरात जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात शिवस्मारक चौथऱ्याचे भूमिपूजन

संकेश्वर (महंमद मोमीन) : जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिवाजी चौक येथील शिवस्मारक चौथऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी शिवस्मारक शिलान्यासचे पूजन केले. पुरोहित मदन पुराणिक यांनी मंत्रपठणात शिवस्मारक चौथऱ्याचे विधीवत पूजन केले. नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, …

Read More »

मराठा फेडरेशनचा भाजप सरकारला निर्वाणीचा इशारा : श्यामसुंदर गायकवाड

बेळगाव : कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गेली वीस वर्ष सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. प्रत्येक सरकार मराठा समाजाला आश्‍वासने देत आहे. राज्यातील विद्यमान भाजप सरकार मराठा समाजाचा राजकीय वापर करून घेत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता केली जावी. यासाठी सरकारला 25 जूनपर्यंत मुदत दिली जात आहे. …

Read More »

मराठी परिपत्रके मोर्चा प्रकरणी दीपक दळवींसह ३१ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मराठीतून परिपत्रके व कागदपत्रे द्यावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. हा मोर्चा विनापरवाना आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप करत मोर्चा रोखुन धरण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला पण उपस्थित कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. त्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका …

Read More »

एम्स संस्थेचे बेळगावात केंद्र स्थापनेसाठी निवेदनाद्वारे मागणी

बेळगाव : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही संस्था नवी दिल्ली येथे आहे. जगभरात नावाजले गेलेले भारतामधील एक नामवंत वैद्यकीय शिक्षण केंद्र अशी या संस्थेची ओळख आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या रूग्णांवर उपचार होत असतात. या संस्थेचे केंद्र बेळगावात स्थापन व्हावे, अशी मागणी सरकारकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या …

Read More »

शहरातील 12 ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची झाडाझडती

बेळगाव : शहर उपनगर परिसरात रहदारी पोलीसांची कारवाई नेहमीच पाहायला मिळत असते. मात्र आज गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहर आणि उपनगरातील एकूण बारा ठिकाणी रहदारी पोलिसांनी अचानकपणे वाहनधारकांची झाडाझडती सुरू केली. त्यामुळे वाहनधारकांची एकच तारांबळ पाहायला मिळाली. शहर उपनगरातील विविध महत्त्वाच्या चौक आणि रस्त्यांवर रहदारी पोलिसांनी आज अधिकाऱ्यांसह ठिय्या मांडलेला दिसून …

Read More »

भारतीय ॲथलीट मुरली श्रीशंकरची ग्रीसमधील जागतिक स्पर्धेत ‘सुवर्ण उडी’!

नवी दिल्ली : भारतीय खेळाडू आता हळूहळू जगभरात आपली ताकद दाखवत आहेत. एकीकडे नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला. त्याचबरोबर एका भारतीय ॲथलीटने लांब उडीत देशाचे नाव रोषण केले आहे. मुरली श्रीशंकरने ग्रीसमध्ये ८.३१ मीटर लांब उडी मारून सुवर्णपदकाला गवसणी घालत इतिहास रचला. मुरली श्रीशंकरने ग्रीसमधील 12व्या …

Read More »