बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगावात आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदानावर भव्य सीमा महामेळावा घेऊन या अधिवेशनाला विरोध करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटक सरकारने चालवलेल्या या प्रथेविरोधात दरवर्षीप्रमाणे महामेळावा घेऊन निषेध नोंदवण्याचा निर्णय …
Read More »महाराष्ट्रातही ओमायक्रॉनची एन्ट्री! मिळाला पहिला बाधित रुग्ण
मुंबई : महाराष्ट्रातही ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. डोंबिवलीमधील रुग्ण बाधित झाला आहे. तो 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेवरून डोंबिवलीमध्ये आला होता. बाधित रुग्णाचे वय 33 आहे. बाधित तरुणाने लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तो 35 जणांच्या संपर्कात आला होता त्या सर्वांची तपासणी पूर्ण झाली आहे. बाधित रुग्ण दक्षिण …
Read More »नंदगडच्या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा बळी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील नंदगड गावच्या दुर्गादेवी (आनंदगड किल्ला) मार्गावर डॅमच्या बाजूला शेतवडीत बिबट्या वाघाच्या हल्ल्यात बैलाचा बळी गेल्याची घटना शनिवारी दि. 4 रोजी घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नंदगड येथील शेतकरी सुरेश चंद्रकांत रामगुरवाड्डी हे आपली जनावरे घेऊन शेतकामासाठी शेताकडे गेले होते. यावेळी बिबट्या वाघाने बैलाचा फडशा …
Read More »केंद्राबरोबर चर्चेसाठी संयुक्त किसान मोर्चाची समिती
नवी दिल्ली : केंद्र सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. तसेच जोपर्यंत देशभरात विविध ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्यांवरील गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहिल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आंदोलनाचे पुढील धोरण ठरविण्यासाठी तसेच केंद्र सरकारबरोबर चर्चा …
Read More »कर्नाटक-महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल
बंदोबस्त कडक : ना ईकडचे ना तिकडचे कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या दुधगंगा नदी जवळ कर्नाटक सीमा तपासणी नाका व कागल येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आरटीओ ऑफिस येथे महाराष्ट्राचा सीमा तपासणी नाका सुरू आहे. या दोन्ही सीमा तपासणी नाक्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणे व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या प्रवाशांना …
Read More »तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला 51 लाख 51 हजारचा निव्वळ नफा
बेळगाव : तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची यंदाची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन ओरिएंटल शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी सभासदांना बारा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी बँकेच्या …
Read More »बेळगावमध्ये एबीव्हीपी राज्य कार्यकारिणी सभेचे आयोजन
बेळगाव : बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावच्या केएलईएस कन्व्हेन्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणी सभेत राज्यातील विविध जिल्ह्यातील एबीव्हीपीचे राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय संघटना सचिव, राज्य अध्यक्ष, राज्य सचिव, प्राध्यापक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यासंदर्भात राष्ट्रीय रचिव हर्ष नारायण यांनी संवाद …
Read More »रायबागमध्ये उद्या काँग्रेसची प्रचारसभा
बेळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी रायबाग येथे काँग्रेसची भव्य प्रचारसभा होणार आहे. पक्षाचे अनेक बडे नेते या सभेला संबोधित करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रचारासाठी रायबाग येथे उद्या प्रचारसभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, माणिकसिंग ठाकूर, आयवन डिसोझा आदी …
Read More »सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानात ऑक्टोबरमध्ये 1.20 कोटीचे दान
बेळगाव : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका-यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत ऑक्टोबर महिन्यात तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, साहित्य व रोख रक्कम जमा झाली आहे. कोरोना लॉकडाऊननंतर प्रथमच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत भक्तांनी विक्रमी दान दिले आहे. महामारी कोरोनामुळे अन्य देवस्थानांप्रमाणेच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानही 1 …
Read More »शेतकर्यांना एकरी पन्नास हजार नुकसान भरपाईसाठी भव्य आंदोलन
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : कर्नाटकात पर्यायाने सीमाभागात अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा वेळी तुटपुंजी नुकसानभरपाई देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार कर्नाटक सरकार करत असून हा अन्यायकारक कारभार आहे. या विरोधात शेतकर्यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta