Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

…तर काँग्रेसच्या पदयात्रेवर कारवाई का केली नाही?

उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले बंगळूर (वार्ता) : कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी (ता.12) राज्य सरकारला रॅली, विशेषत: काँग्रेसकडून काढण्यात येणार्‍या रॅलींना परवानगी का दिली आणि दिली नसेल तर योग्य कारवाई का केली गेली नाही, असा जाब विचारून सरकारला चांगलेच फटकारले. या संदर्भात दोन दिवसांत माहिती देण्याचे सरकारला निर्देश दिले. मुख्य न्यायमूर्ती …

Read More »

बेळगांवमध्ये विविध भागांत ड्रेनेज व सिडी निर्माण कामाला आमदार अनिल बेनके यांच्याकडून चालना

बेळगांव (वार्ता) : आज दि. 11 जानेवारी 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी महानगरपालिकेच्या 15 व्या वित्तमधून बेळगांवमधील कामत गल्ली, कोनवाळ गल्ली व साई हॉटेलपासून मराठा मंडळ सर्कलपर्यंत अशा विविध भागात ड्रेनेज, सिडी वर्क व कंपाऊंड वॉल निर्माण कामाचे भुमिपूजन करून चालना दिली. यावेळी बोलताना आमदार अनिल …

Read More »

रामदुर्ग येथील दुकान गाळे धारकांचा लिलावाला विरोध

बेळगाव (वार्ता) : रामदुर्ग नगरपालिकेने पुनर्वसन केलेल्या खोकीधारकांच्या दुकान गाळ्यांचा लिलाव केला जाऊ नये. वाढीव भाडे घ्यावे परंतु त्यांना तेथून हटवू नये, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) रामदुर्ग तालुका समितीने केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) रामदुर्ग तालुका समितीच्या शिष्टमंडळाने आज उपरोक्त मागणीचे निवेदन रामदुर्ग नगरपालिकेच्या मुख्य अधिकार्‍यांसह बेळगाव …

Read More »

उत्तम डॉक्टर व्हा : डॉ. जयप्रकाश करजगी

संकेश्वर (वार्ता) : श्री बिरेश्वर शिक्षण संस्था संचलित कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी उत्तम डॉक्टर व्हावा, असे शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. जयप्रकाश करजगी यांनी सांगितले. ते कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलच्या वार्षिक स्नेहसंमेलन ’तरंग’-2021-22 समारंभात अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी विद्यार्थिनींने स्वागतगीत सादर केले. प्रमुख पाहुणे राजीव गांधी विद्यापिठाचे डीन. …

Read More »

झोपडपट्टीवासियांना घोषणा पत्रांचे वाटप

बेळगाव (वार्ता) : कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळ उत्तर मतदारसंघातील घोषित सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झोपडपट्टीवासीयांसाठी घोषणापत्र वितरणाचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. शहरात आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बेळगाव उत्तरचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांच्या हस्ते हा घोषणा पत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना …

Read More »

खानापूरात प्राथमिक शाळांच्या आवारात शुकशुकाट

खानापूर (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोना तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून तिसर्‍या लाटेचे संकट निर्माण होत आहे. याची खबरदारी घेऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा तसेच हायस्कूलमधील इयत्ता नववीच्या वर्गापर्यतच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून देण्यास मंगळवारी दि. 11 ते मंगळवारी दि. 18 पर्यंत निर्बंध घातले आहे. …

Read More »

ग्रामीण भागातील विकासाला प्रथम प्राधान्य : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी

बेळगाव (वार्ता) : बेळगाव ग्रामीण भागातील विकासाला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल, असे विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. बेळगाव तालुका लवादाच्या मंगळवारी झालेल्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण क्षेत्रात विकास होणे गरजेचे आहे. विकासकामे पूर्ण करण्यासाठी कर्मचार्‍यांनी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे यावेळी उपस्थित …

Read More »

कोगनोळीत वीस एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

कोगनोळी (वार्ता) : येथील हणबरवाडी रोडवर असणार्‍या इनाम पट्टी मळ्यात वीस एकर उसाला शॉर्टसर्किटने आग लागून जळून खाक झाल्याची घटना मंगळवार तारीख 11 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. यामध्ये शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील हणबरवाडी रोडवर असणार्‍या इनाम पट्टी मळ्यात …

Read More »

वल्लभगडावर एनएसएसची स्वच्छता मोहिम

  संकेश्वर (वार्ता) : येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. मंदार हावळ यांच्या सौजन्याने वल्लभगडावर आज संकेश्वर महाविद्यालयाच्या (एन.एस.एस.) विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेचे कार्य केले. संकेश्वरजवळ असलेल्या वल्लभगडाला शिवकालिन इतिहास राहिला आहे. वल्लभगडाचे संवर्धन करण्याचे काम संकेश्वर दुर्गवीर प्रतिष्ठान आणि डॉ. मंदार हावळ परिवाराकडून केले जात आहे. संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्था …

Read More »

चिक्कोडी प्रांताधिकारीपदी संतोष कामगौडा रुजू

चिक्कोडी (वार्ता) : मूळचे चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर गावचे रहिवासी आणि 2014 च्या तुकडीचे केएएस अधिकारी संतोष कामगौडा यांनी चिक्कोडी प्रांताधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संतोष कामगौडा यांनी आधी प्रशिक्षणार्थी म्हणून व नंतर विविध ठिकाणी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. रायचूर येथे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी आपल्या …

Read More »