Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये स्फोट ९ जणांचा मृत्यू

  जम्मू : दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाची घटना ताजी असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये देखील स्फोटाची भयंकर घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोटाची ही घटना घडली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. पोलिस ठाण्यामध्ये उपस्थित असलेल्या २ पोलिस अधिकाऱ्यांसह ९ जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला. तर ३० जण गंभीर …

Read More »

रोशनी बामणे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : चिक्कबळ्ळापूर येथील एम. व्ही. जिल्हा अंतर्गत क्रीडांगण स्टेडियममध्ये सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे 17 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा कराटे संघटनेच्या मन्नूर व गोजगे शाखेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या रोशनी बामणे हिचा प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला असून तिला …

Read More »

महिलांची वैचारिक आणि बौद्धिक पात्रता वाढवणे म्हणजे खरे सक्षमीकरण : शिवानी पाटील

  खानापूर : स्त्रियांना हवे तसे जगायला मिळणे म्हणजे खरे सक्षमीकरण नव्हे, तर महिलांची वैचारिक आणि बौद्धिक पात्रता वाढवणे म्हणजे खरे सक्षमीकरण होय, असे मत म. ए. समितीच्या महिला कार्यकर्त्या सौ. शिवानी पाटील यांनी व्यक्त केले. श्रमिक अभिवृद्धी जनजागृती संघाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून शिवानी पाटील बोलत …

Read More »

बोरगांव विविधोद्देशगळ प्राथमिक संघातर्फे अभिनंदन पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

  निपाणी ‌(वार्ता) : बोरगांव येथील विविधोद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या संचालक मंडळातर्फे युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांचा पाटील यांचा ५० व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता.१४) अरिहंत मल्टीस्टेट संस्थेच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. अशोक माळी यांनी युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या …

Read More »

आजच्या युगात वधू -वर मेळावे काळाची गरज : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : आधुनिक युगात माणसाची जीवनशैली बदलली आहे. त्याचबरोबर विवाह पद्धतीतही अमुलाग्र बदल झालेले आहेत.आजच्या युगात शैक्षणिक स्तरावर मुलींनी भरीव प्रगती केली आहे.त्यामानाने मुलांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी दिसून येते. आणि यातूनच मराठा समाजामध्ये मुला मुलींचे विवाह जुळवताना पालकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. यासाठी वधू वर मेळावे काळाची …

Read More »

“कॅपिटल-वन” एस्. एस्. एल. सी. व्याख्यानमाला रविवारपासून

  बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील कॅपिटल वन या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे एस्. एस्. एल. सी. च्या विद्यार्थ्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. बेळगाव आणि परिसरातील शालेय परीक्षेत अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविलेले व त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागसलेल्या पाच विद्यार्थ्यानां या व्याखानमालेचा लाभ घेता येणार आहे. रविवार दि 16-11-2025 पासून रविवार …

Read More »

शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवतेज पाटीलला ब्रांझ पदक

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत येथीलशिवतेज भारत पाटील यांने ब्रांझ पदक पटकावले. गोडगिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. सदरच्या राज्यस्तरीय स्पर्धा मारियामानहळ्ळी (जि. विजयनगर) येथे पार पडल्या. राज्यातून २३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मॅटवर पार पडलेल्या कुस्तीत ६० किलो वजनी गटात …

Read More »

महामार्ग सेवा रस्त्यावरील शिंदे नगरला बस थांबण्यासाठी आगारप्रमुखांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : येथील पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उपनगरातील प्रभाग क्र. २० शिंदे नगर परिसरात असणारा महामार्गानजीक सेवा रस्त्यावर बस थांबा आहे. बरेच चालक व वाहक या ठिकाणी बस थांबवत नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी निपाणी आगार प्रमुखांनी या ठिकाणी बस थांबवण्याच्या मागणीची …

Read More »

बेनाडी भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील भाग्यलक्ष्मी सौहार्द क्रेडिट संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर बैठक होऊन सर्वानुमते संस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र जनावडे तर उपाध्यक्षपदी राजेंद्र क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मधुकर जाधव यांनी स्वागत केले. नूतन अध्यक्ष रवींद्र जानेवाले यांचा सदाशिव जनवाडे व शंकर जनवाडे यांच्या हस्ते तर …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे १५ नोव्हेंबर रोजी रोप्यमहोत्सवी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने दिनांक 15 नोव्हेंबर रोजी कॉम्रेड कृष्णा मेणसे साहित्य नगरी स्कूल ऑफ कल्चर (गोगटे रंगमंदिर) येथे 25 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. मृणाल निरंजन पर्वतकर …

Read More »