Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

एकदंत युवक मंडळाचा अनोखा उपक्रम… आश्रमातील मुलांच्या हस्ते गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ

  बेळगाव : सार्वजनिक श्री एकदंत युवक मंडळ एस टी एम संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने सामाजिक भान राखत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे नंदन मक्कल धाम आश्रम येथील लहान मुलाच्या हस्ते तसेच श्री. मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या शुभ हस्ते मुहुर्तमेढ करण्यात आली. यावेळी गजराज सेवेकरी …

Read More »

गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती?

  सण-उत्सवाच्या काळात बदली करू नये, नागरिकांमधून व्यक्त होत आहे सूर बेळगाव : पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची हुबळी-धारवाडच्या पोलीस आयुक्तपदी झालेली बदली ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शासनाकडून ही बदली तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, यासंदर्भातील अधिकृत लेखी आदेश पुढील एक-दोन दिवसांत येण्याची शक्यता …

Read More »

संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा यांची मल्लखांब स्पर्धेत चमकदार कामगिरी!

  बेळगाव : संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा, बेळगावी येथील विद्यार्थ्यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील गुडिलोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्या भारती दक्षिण मध्य क्षेत्र मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सर्वोच्च पारितोषिके पटकावली. निकाल – विभागीय स्तर (राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड): U-17 मुली: नक्षुषा कडोलकर (प्रथम), गुंजन चौगुले (द्वितीय), …

Read More »

गणेशोत्सवासाठी बेळगाव पोलिसांची ‘सिंगल विंडो’ व्यवस्था

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या सहज आणि एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी बेळगाव शहर पोलिसांकडून ‘सिंगल विंडो’ अर्थात एक गवाक्ष व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पासून शहरातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. गणेश मंडळांना मंडप उभारणी, विद्युत जोडणी, …

Read More »

लोंढा बस डेपोत बस नियंत्रकाची नियुक्ती : पंचहमी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णींच्या प्रयत्नांना यश

  गुंजी : लोंढा बस स्थानकात परिवहन खात्याच्या सर्व बसेस येत नसल्याची तक्रार अनेक दिवसापासून होती. मोजक्याच बसेस बस स्थानकात येऊन जात होत्या अनेक बसेस लोंढा क्रॉस वरूनच जात असल्याने लोंढा बस स्थानकात बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागत होता. लोंढा हे रेल्वे जंक्शन स्टेशन असून बाजारपेठेचे …

Read More »

ऊस पिकावर पांढऱ्या किडींच्या प्रादूर्भावाने निपाणी भागातील शेतकरी हतबल

    निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरातील साखर कारखान्यांच्या उच्च क्षमतेमुळे वाढलेल्या ऊसाच्या पिकावर आता पांढऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस पिकाची वाढ खुंटत असून पानेही पिवळी पडत आहेत. परिणामी उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थीक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात असलेल्या साखर कारखान्यांच्या व कृषी …

Read More »

श्रींच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात

  रंगकाम सुरू ;विविध मंडळांकडून नोंदणी सुरू निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील गणेश मूर्तिकारांच्या कुशल हातांनी श्रींच्या मूर्तीवर अंतिम हात फिरविणे सुरू असून, पांरपारिकतेला आधुनिक कलाकुसरीची जोड देत विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपांच्या मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपतीच्या मूर्तीचे बुकिंग सुरू …

Read More »

गोकाकमध्ये पहाटे रौडीशीटरांच्या घरांवर पोलिसांचा छापा

    गोकाक : गोकाक शहरात रविवारी पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा रौडीशीटरांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकून तपासणी केली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. डीवायएसपी रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सीपीआय श्रीशैल बाकोड, गोकाक शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण मोहिते, ग्रामीण पीएसआय के. वालिकर …

Read More »

मराठीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा युवा समिती सीमाभागतर्फे सन्मान

  बेळगाव : कर्नाटक सरकारने प्राथमिक शाळांमधील १५,००० शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमातील उमेदवारांना स्थान न दिल्याने, मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांनी तातडीने आवाज उठवत संबंधित प्रशासनाला निवेदन दिले होते. यानंतर या …

Read More »

येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने वृक्षारोपण

  येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या वतीने फुटूक तलाव स्मशानभूमी येथे वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला येळ्ळूर म. ए. समितीचे अध्यक्ष वामन पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रथम आंबा, फणस, जांभूळ, कलम, सावर, इत्यादी जातीची झाडे लावण्यात आली. त्यानंतर दुदाप्पा बागेवाडी यांनी प्रास्तविकमध्ये पर्यावरण विषयी माहिती दिली. राजु …

Read More »