न्यूयॉर्क : ‘भारतात मुस्लिम राहू नयेत, असे कोणत्याही हिंदूला वाटत असेल, तर तो हिंदू असू शकत नाही. स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे असेल, तर सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात, यावर विश्वास ठेवला पाहिजे,’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. न्यूयॉर्क येथे आयोजित ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ …
Read More »‘बेळगावचा राजा’च्या नव्या रथाचे चव्हाट गल्ली येथे उत्साहात अनावरण
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बेळगावचा राजा’ नवसाला पावणाऱ्या गणरायाच्या आगमनाची तयारी मोठ्या दिमाखात सुरू असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी नव्या रूपात साकारण्यात आलेल्या भव्य रथाचे उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, सुनील जाधव, विनायक पवार, प्रज्वल पाटील, कुशल पाटील आणि प्रीतम चौगुले, प्रशांत कुडे, उमेश मेणसे, सत्यम नाईक, …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडादिन साजरा
बेळगाव : भारताचे महान हॉकीपट्टू मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील उपस्थित होते. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आणि मेजर ध्यानचंद यांच्या विषयी …
Read More »मरणहोळ येथे बिबट्याचा म्हशीच्या रेडकावर हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
दड्डी : मरणहोळ, ता. बेळगाव येथे शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास जंगलालगत शेतात चरण्यासाठी सोडलेल्या म्हशीच्या दीड ते दोन वर्षांच्या रेडकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे मरणहोळ परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी मारुती पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपली जनावरे जंगलालगत …
Read More »केसरेकर दाम्पत्याच्या मारेकऱ्यास फाशी द्या; निवृत्त मराठी शिक्षक संघाच्या बैठकीत मागणी
कुटुंबाचे पालकत्व सरकारने घ्यावे, ठराव मंजूर खानापूर : खानापूर तालुका निवृत्त मराठी शिक्षक संघाची मासिक बैठक शुक्रवारी संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात अध्यक्ष डी. एम. भोसले गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सांगली-कुपवाड येथे हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर या दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा …
Read More »श्रावण मासानिमित्त शिवबसव नगरमधील जोतिबा मंदिरात ३० ऑगस्ट रोजी केदार विश्वशांती यज्ञ
बेळगाव : शिवबसव नगर येथील श्री जोतिबा मंदिरात श्रावण मासानिमित्त मंदिर व्यवस्थापन कमिटीच्या वतीने रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी श्री केदार विश्वशांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यज्ञाच्या निमित्ताने सकाळी ७ वाजता श्री नाथांचा रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यवाचन, गणपती पूजन, शक्तिपीठ पूजन, नवग्रह पूजन, रुद्रपीठ पूजन, …
Read More »खानापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर सोमवारी सर्वपक्षीय बैठक; आमदार हलगेकरांचा पुढाकार
खानापूर : खानापूर तालुक्यासह शहरातील विविध प्रलंबित समस्या आणि विकासकामांना गती देण्यासाठी सोमवार, दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता राजा शिवछत्रपती शिवस्मारक येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या बैठकीचे आयोजन खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. …
Read More »वैद्य रुपेश साळुंखे यांना ‘कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न’ पुरस्काराने सन्मानित
बेळगाव : आयुर्वेदाच्या माध्यमातून गेल्या अडीच दशकांपासून अविरत रुग्णसेवा, आयुर्वेदाचा प्रसार-प्रचार आणि समाजसेवेचे कार्य करणारे वैद्य रुपेश साळुंखे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेच्या ‘कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. बंगळूरु येथे २३ ऑगस्ट रोजी झालेल्या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात …
Read More »चापगावसह चार गावांसाठी नवीन बससेवा सुरू; विद्यार्थी, शेतकरी व नोकरदारांना दिलासा
खानापूर : चापगावसह यडोगा, कारलगा आणि लालवाडी परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची बससेवेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि गॅरंटी योजना समितीचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे खानापूर बस आगारातून खानापूर–चापगाव मार्गावर दैनंदिन नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा …
Read More »भारत विकास परिषदेच्यावतीने “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा-परिक्षा
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवार दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जीजीसी सभागृह, बुधवार पेठ टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. कनिष्ठ विभागात सहावी ते आठवी व वरिष्ठ विभागात नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. एका संघात दोन विद्यार्थी असतील. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta