Saturday , August 29 2026
Breaking News

भारत विकास परिषदेच्यावतीने “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा-परिक्षा

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवार दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जीजीसी सभागृह, बुधवार पेठ टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
कनिष्ठ विभागात सहावी ते आठवी व वरिष्ठ विभागात नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. एका संघात दोन विद्यार्थी असतील. स्पर्धेत परिषदेतर्फे प्रकाशित ‘भारत को जानो’ या पुस्तकातील प्रश्न विचारले जातील. ज्यामध्ये भारताच्या संपूर्ण इतिहासाची इत्थंभूत माहिती आहे. स्पर्धा 4 फेऱ्यांमध्ये होईल. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतील. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी प्रांतस्तरीय स्पर्धेस पात्र ठरतील. प्रांतस्तरीय विजेते दक्षिण भारत विभागीय तसेच तेथील विजेते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
तत्पूर्वी सोमवार दि. 31 ऑगस्ट रोजी सहभागी सर्व शाळांमधून भारताविषयी सामान्यज्ञान लिखित परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देशभरातून एकाच दिवशी होणाऱ्या या लिखित परीक्षेत 1 करोड विद्यार्थी सहभागी होतील, याप्रमाणे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष विनायक मोरे अथवा स्पर्धाप्रमुख विनायक घोडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भाविपने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी माध्यमाच्या शिक्षक पदांच्या वाटपाचा फेरआढावा घ्या : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन

Spread the love    बेळगाव : मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार करून सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *