बेळगाव : पर्यावरण संवर्धन आणि हरित बेळगावच्या उद्देशाने रेसकोर्स मॉर्निंग वॉकर्स ग्रुपच्या वतीने जून, जुलै आणि ऑगस्ट २०२६ या तीन महिन्यांत विविध फळझाडांच्या तब्बल १०,२५३ बिया गोळा करून त्या रेसकोर्स परिसर तसेच इतर जंगल भागात पेरण्याचा संकल्प करण्यात आला होता. हा संकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल मॉर्निंग वॉकर्स ग्रुपच्या …
Read More »मराठी माध्यमाच्या शिक्षक पदांच्या वाटपाचा फेरआढावा घ्या : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन
बेळगाव : मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार करून सध्याच्या शिक्षक भरती अधिसूचनेचा तातडीने फेरआढावा घेऊन मराठी माध्यमासाठी स्वतंत्रपणे शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शिक्षक भरतीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अधिसूचनेमध्ये मराठी माध्यमाच्या पदांबाबत …
Read More »प्रकाश निकम बेळगावचे नवे पोलीस आयुक्त; भूषण बोरसे यांची धारवाडला बदली
बेळगाव : बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश निकम यांची नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचे उपसचिव संजय बी. एस. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, २००९ च्या तुकडीतील डीआयजी दर्जाचे अधिकारी भूषण बोरसे …
Read More »बेळगावने देशाला तीन ऑलिम्पिक हॉकीपटू दिले : ब्रिगेडियर गिरीश उपाध्या
बेळगाव : बेळगावने देशाला तीन ऑलम्पिक हॉकीपटू दिले आहेत मराठा सेंटरने सुद्धा हॉकीला खूप महत्त्व दिलेले आहे हॉकी हा खेळ क्रीडापटूंना सदृढ ठेवतो पुढील ऑलिंपिक स्पर्धेसाठी आतापासूनच हॉकीपटुनी जय्यत तयारी करावी आजच्या हॉकी स्पर्धा पाहून माझे मन भरून आले असे मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटरचे ब्रिगेडियर गिरीश उपाध्या बोलताना …
Read More »विद्यार्थी संघटनांवरील बंदीचा निर्णय मागे घ्या
एआयडीएसओचा तीव्र निषेध; ‘विद्यार्थी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न’ असल्याचा आरोप बेळगाव : पदवीपूर्व व पदवी महाविद्यालयांमध्ये आगामी विद्यार्थी संघटना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन आवारात विद्यार्थी संघटनांना प्रवेशास मनाई करण्याच्या निर्णयाला ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनने (एआयडीएसओ) तीव्र विरोध केला आहे. विद्यार्थी संघटनांवर निर्बंध लादण्याची सरकारची भूमिका ही विद्यार्थीविरोधी असून, संघटित …
Read More »बेळगावसह खानापूर तालुक्यात उद्या ‘पॉवर कट’!
हेस्कॉमच्या दुरुस्ती कामाचा फटका; बेळगावसह खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा ठप्प बेळगाव : हेस्कॉमच्या दुरुस्ती कामामुळे मागील आठवड्यात बेळगाव शहर अंधारात गेले होते. आता दुरुस्तीच्या कामांचा मोर्चा ग्रामीण भागाकडे वळला असून, रविवारी (३० ऑगस्ट) बेळगाव व खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा तब्बल सात ते आठ तास बंद राहणार आहे. …
Read More »मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेला २ कोटी ८८ लाखांचा निव्वळ नफा
बेळगाव : मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय आर्थिक कामगिरी करत २ कोटी ८८ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील व संचालक मंडळाने ही माहिती दिली. बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बेळगाव येथील …
Read More »गोव्यात कॅसिनो संचालकावर गोळीबार; श्रीनिवास नायक थोडक्यात बचावले
गोवा : गोव्यातील प्रसिद्ध कॅसिनो ‘प्राइड’ आणि ‘मॅजेस्टिक’चे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात नायक तसेच त्यांचे सुरक्षा कर्मचारी बचावले असून, कोणालाही गोळी लागलेली नाही. श्रीनिवास नायक हे मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. गोव्यातील पणजीजवळील पर्वरी येथील …
Read More »श्री राम कॉलनी आदर्श रहिवासी संघटनेचा सहावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात
बेळगाव : श्री राम कॉलनी आदर्श रहिवासी संघटनेचा सहावा वर्धापनदिन विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी गंगा नारायण सभागृहात आयोजित कार्यक्रमाला रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष बाबुराव घोरपडे, माजी महापौर मंगेश पवार, कार्याध्यक्ष डॉ. मुरुगेन्द पटृनशेटी, सेक्रेटरी सुधीर …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे रक्षाबंधन सण साजरा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे रक्षाबंधन साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न आणि उपाध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री. सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रथमेश पूजन झाले सुजाता जाधव, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta