बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशा सेविकांना १० हजार रुपये मानधन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्त्या संघाने केली आहे. आज बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हंदिगनूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची आठवण करून देत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू
कल्याण : चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व मंगलराघोनगर परिसरात घडली आहे. सप्तशृंगी असं या इमारतीचे नाव आहे. या भीषण घटनेत ढिगार्याखाली अडकून सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यात तीन महिलासह एका दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर इमारतीमध्ये काही जण अद्यापही अडकलेले असल्याची …
Read More »ठळकवाडी हायस्कूलच्या 73 बॅचचा स्नेहमेळावा…..
बेळगाव : 1973 मध्ये एस्.एस्.एल् सी. उत्तीर्ण झालेल्या ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा तिसरा स्नेहमेळावा दि. 18 मे रोजी ठळकवाडी हायस्कूल येथे संपन्न झाला. या मेळाव्यात देशाच्या विविध भागात विखुरलेले 60 विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. 52 वर्षांपूर्वी ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेत पुन्हा एकत्र येऊन या विद्यार्थ्यांनी वेगळा आनंद …
Read More »माजी विद्यार्थ्यांची 25 वर्षांनी पुन्हा भरली शाळा….
2000 – 2001 मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा चंदगड : पंचवीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. शाळेची ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाका वरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते चंदगड तालुक्यातील नागरदळे येथील श्री नागनाथ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे. नागरदळे तालुका चंदगड येथील श्री …
Read More »अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा सहभागी?
बेळगाव : बेळगाव शहराच्या बाहेरील भागात असलेल्या एका रिसॉर्टमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. अल्पवयीन मुलगी जेव्हा घरी परतली तेव्हा तिने पोटदुखीची तक्रार आपल्या आईकडे केली. आईने तिला रुग्णालयात घेऊन गेली तेव्हा हे प्रकरण उघडकीस …
Read More »बामणवाडीत सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना निवेदन सादर
बेळगाव : बामणवाडी गावातील सर्व्हे नं. 29 /बी मधील सरकारी गायरान जमिनीचा गैरवापर करून ती हडपण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत संपाद अधिकारी कल्लाप्पा बाळप्पा चिगरे हे करत आहेत. तरी या प्रकाराला तात्काळ आळा घालून सदर जमीन गावाच्या नावे अबाधित ठेवावी, अशी मागणी बामणवाडी (ता. जि. बेळगाव) ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि …
Read More »छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
मुंबई ,: राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता हा शपथविधी पार पडला. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या …
Read More »ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
पुणे : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वात शोककळा पसरली आहे. सहजसोप्या भाषेत वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणाऱ्या नारळीकरांनी ‘व्हायरस’, ‘यक्षांची देणगी’ यांसारखी पुस्तके लिहिली जी खूप गाजली. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, झोपेतच ते शांतपणे अनंतात …
Read More »मनपा नगर नियोजन, सुधारणा स्थायी समितीची 21 रोजी बैठक
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या नगर नियोजन आणि सुधारणा स्थायी समितीची बैठक बुधवार दि. 21 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीच्या विषय पत्रिकेवर पुढील प्रमाणे विषय असणार आहे. 1) मागील गेल्या 28 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी …
Read More »ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हिरेमठ यांच्यावरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घ्या अन्यथा उग्र आंदोलन…
बेळगाव : संतीबस्तवाड गावात कुराण विटंबनेप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे निलंबित असलेले बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांच्या समर्थनात आणि त्यांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी बेळगावातील विविध हिंदू संघटनांनी संघटितपणे राणी कित्तुर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडून मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राणी कित्तुर चन्नम्मा सर्कल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta