Sunday , July 26 2026
Breaking News

छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Spread the love

 

मुंबई ,: राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता हा शपथविधी पार पडला.

धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भुजबळांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे मुंडेंकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खातच भुजबळांना देखील देण्यात येईल अशी चर्चा आहे.

भुजबळांच्या मंत्रीपदानंतर आता नाशिक जिल्ह्याकडे चार मंत्रीपदे आली आहेत. यामध्ये दादा भुसे (शालेय शिक्षण), नरहरी झिरवळ (अन्न आणि औषध), माणिकराव कोकाटे (कृषी) आणि छगन भुजबळ यांना मंत्रीपदे मिळाली आहेत.
दरम्यान, भुजबळांना अद्याप अधिकृतरित्या खातं जाहीर झालेले नसले तरी मुख्यमंत्री जे खाते देतील ते आपण स्विकारु अशी प्रतिक्रिया मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी दिली आहे. पण यापूर्वी भुजबळांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद चांगल्याप्रकारे भूषवल्याने त्यांच्याकडे हेच मंत्रीपद येण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास

Spread the love  पुणे : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, ‘युवक क्रांती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *