बेळगाव : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारत पाकिस्तानला देत असलेल्या प्रत्युत्तराच्या समर्थनार्थ बेळगावमध्ये आज राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांची शनिवारी भव्य रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत विद्यार्थी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सी.एम. त्यागराज म्हणाले की, केंद्र …
Read More »बेळगावात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कडेकोट बंदोबस्त : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
२-३ दिवसांत मॉक ड्रील बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत असून, येत्या २-३ दिवसांत मॉक ड्रील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज दिली. आज देशातील युद्धसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस …
Read More »भारत-पाकिस्तान युद्धविराम! दोन्ही देशांची तयारी
नवी दिल्ली : गेल्या तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता दोन्ही देश शस्त्रसंधीला राजी झाले असून, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू झाला आहे. याबाबतची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. भारत आणि पाकिस्तानमध्ये …
Read More »सीमाकवी रवींद्र पाटील यांचा कराड साहित्य संमेलनात विशेष सन्मान
कराड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दिनांक ९ व १० मे २०२५ रोजी कराड (जिल्हा सातारा) येथील यशवंतराव चव्हाण स्मृती भवन, टॉऊन हॉल या ठिकाणी अत्यंत प्रेरणादायी आणि साहित्यिक उर्जेने भरलेल्या वातावरणात पार पडले. या संमेलनात बेळगावचे प्रथितयश सीमाकवी रवींद्र …
Read More »पाकिस्तानच्या तोफगोळ्याच्या माऱ्यात आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू
जम्मू काश्मीर : सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून सडेतोड उत्तर दिले जात असताना भारतातील अनेक नागरिकांना यामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी येथे पाकिस्तानने डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोट झाला. त्यामध्ये राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद झाले आहेत. यासह आणखी दोन नागरिकांचाही मृत्यू झाला. पाकिस्तानने शनिवारी …
Read More »ऑपरेशन सिंदूरमधील जवानांच्या समर्थनार्थ बेंगळुरूमध्ये कर्नाटक काँग्रेसची ‘तिरंगा रॅली’
बेंगळुरू : पहलगाम येथील हल्ल्यानंतर सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातून भारतीय सैनिकांप्रती एकता आणि समर्थन व्यक्त केले जात आहे. कर्नाटक काँग्रेसनेही ‘तिरंगा यात्रा’ काढून या भावनांना वाट मोकळी करून दिली. आज सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूरमधील के.आर. सर्कल येथून या रॅलीला प्रारंभ झाला. ‘देशभक्ती दर्शवूया, एकता …
Read More »आता विराट कोहलीही घेणार कसोटीमधून निवृत्ती?
मुंबई : रोहित शर्माच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याने बीसीसीआयलाही या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे विराटच्या या निर्णयानंतर आता तो आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र असे असले तरी बोर्डाच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने …
Read More »सरस्वती गर्ल्स हायस्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थिनींचा पुनर्मिलन कार्यक्रम उद्यापासून
बेळगाव : 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी सरस्वती मुलींची हायस्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थिनींचा पुनर्मिलन असा संयुक्त कार्यक्रम उद्या शनिवार दि. 10 व रविवार दि. 11 रोजी आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार श्री. अभय पाटील यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने जुन्या शाळेच्या जागी नवीन इमारत …
Read More »बेळगावचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद मेत्री याचा सन्मान
बेळगाव : थायलंड, पटाया येथे १० ते १३ मे च्या दरम्यान होणाऱ्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी बेळगावचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याची निवड झाली आहे. कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्टस्, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्टस्, संजय सुंठकर स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने मेत्री यांचा सत्कार झाला. राज्याध्यक्ष संजय …
Read More »सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता आयपीएल फक्त एका आठवड्यासाठी स्थगित केले असल्याची नवी माहिती समोर आली आहे. एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, ‘सध्याच्या परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta