Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

२२ ते ३१ जानेवारीदरम्यान राज्य विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन

  मंत्रिमंडळाचा निर्णय; मनरेगा नामांतरावर होणार वादळी चर्चा बंगळुर : राज्य सरकारने चालू वर्षातील पहिले विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन याच महिन्याच्या २२ ते ३१ जानेवारीदरम्यान घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत कायदा व संसदीय कामकाज …

Read More »

ममदापूरमधील भाजपच्या सरिता पाटील यांचा कार्यकर्त्यांसह उत्तम पाटील गटात प्रवेश

  निपाणी (वार्ता) : ममदापूर (केएल) येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपच्या माजी ग्रामपंचायत उपाध्यक्षा सरिता संतोष पाटील, संतोष पाटील यांनी आपल्या सहकारी समर्थक, कार्यकर्त्यांसह सहकाररत्न उत्तम पाटील गटात अधिकृत जाहीर प्रवेश केला. यावेळी युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, ग्रामपंचायत सदस्य निरंजन पाटील सरकार यांची प्रमुख …

Read More »

विद्यार्थ्यांच्या मारहाणीत आठवीत शिकणारा विद्यार्थी जखमी

  बेळगाव : एका विद्यार्थ्यावर वरिष्ठ वर्गातील मुलांच्या टोळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील कॅम्प परिसरातील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये बुधवारी घडली. मारहाणीत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या इब्राहिम आगा (वय १४) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी विद्यार्थी इब्राहिम आगा याने दिलेल्या माहितीनुसार “मी शाळेच्या मधल्या …

Read More »

बॅगेतून दागिने चोरणारी शिक्षिका रंगेहात पोलिसांच्या जाळ्यात

  बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासादरम्यान एका महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या एका शिक्षिकेला मार्केट पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. अटक करण्यात आलेली महिला बेळगाव तालुक्यातील हिंडलगा लक्ष्मी नगर येथील रहिवासी असून तिचे नाव पद्मश्री मजगावी असल्याचे समोर आले आहे. ही महिला शहरातील एका नामांकित खासगी शैक्षणिक संस्थेत …

Read More »

नंदगड बाजारपेठेत हुतात्मादिनाची खानापूर समितीची जागृती

  खानापूर : 1956 साली स्वतंत्र भारतात भाषांवर प्रांतरचना करतांना तात्कालीन केंद्र सरकारने अन्यायाने 40 लाख मराठी बहुभाषिकांना त्या वेळच्या म्हैसूर प्रांतात म्हणजेच आत्ताचे कर्नाटक यामध्ये डांबल्याच्या निषेधार्थ सीमाभागासह मुंबई प्रातांत म्हणजेच आत्ताच्या महाराष्ट्रात आंदोलन छेडले गेले या आंदोलनात अनेक हुतात्मे झाले त्या मध्ये खानापूर तालुक्याचे कै. नागाप्पा होसुरकर हे …

Read More »

सरिता पाटील ठरल्या ममदापूरच्या होम मिनिस्टर

    उत्तम पाटील युवाशक्ती, समविचारी आघाडीतर्फे आयोजन ; परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर ममदापूर येथे उत्तम पाटील युवाशक्ती व समविचार आघाडी यांच्यातर्फे हळदी–कुंकू व ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये सरिता पाटील या ममदापूरच्या होम मिनिस्टर ठरल्या. त्यांना मीनाक्षीताई पाटील, धनश्री पाटील, विनयश्री पाटील …

Read More »

कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या भिवशी शाखा अध्यक्षपदी अक्षय पाटील यांची निवड

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या भिवशी येथील शाखेचे उद्घाटन राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. संघटनेच्या शाखा अध्यक्षपदी अक्षय पाटील, गौरवाध्यक्षपदी उपाध्यक्षपदी प्रीतम कांबळे, कार्याध्यक्षपदी शुभम म्हाळुंगे, उपाध्यक्षपदी प्रवीण चौगुले, सेक्रेटरीपदी जगदीश लोहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाखा संचालकपदी मारुती चौगुले मधुकर पाटील, दादू …

Read More »

‘पर्यावरण रन – २०२६’ मध्ये कु. अथर्व कलखांबकरचे सुयश

  ५.५ किमी स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक बेळगाव : सेंट पॉल्स हायस्कूल, कॅम्प (बेळगाव) येथे जयभारत फाउंडेशनच्या सहकार्याने रविवारी दि. ११ जानेवारी २०२६ रोजी ‘पर्यावरण रन – गो ग्रीन मॅरेथॉन २०२६’ (द्वितीय आवृत्ती) उत्साहात पार पडली. ग्रीन सिटी, क्लीन सिटी – लेट्स रन फॉर अवर ड्रीम सिटी या संकल्पनेखाली आयोजित …

Read More »

नेसरी – दड्डी गाडी कायमस्वरूपी सोडावी; विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी

  नेसरी (संजय धनके) : नेसरी हे आजरा – गडहिंग्लज व चंदगड या तिन्ही तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून माजी आमदार कै.तुकाराम कृष्णाजी कोलेकर यांच्या आशीर्वादाने विद्येचे माहेरघर समजले जाते, येथे आसपासच्या गावाबरोबरच सीमा भागातील कर्नाटकमधून दड्डी- कोट, बेळंकी, मोदगे येथील बरेचसे विद्यार्थी नेसरी येथे शिक्षणासाठी येत असतात. त्यांना नेसरी वाहतूक …

Read More »

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

  बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5-00 वाजता रंगुबाई पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 17 जानेवारी हुतात्मा दिनासंदर्भात चर्चा होणार आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव …

Read More »