Tuesday , September 17 2024
Breaking News

Belgaum Varta

60 खाटांच्या माता व बाल रुग्णालयाचे उद्घाटन व 100 खाटांच्या रुग्णालय इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम उद्या

  खानापूर : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव तसेच जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापुर शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत बांधण्यात आलेल्या 60 खाटांचा माता व बाल रुग्णालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि नाबार्ड RIDF-30 योजनेंतर्गत 100 खाटांच्या तालुका रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ उद्या …

Read More »

गौरी निर्माल्य संकलनाची ८ वर्षे

  दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनाचा उपक्रम निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन करण्याच्या समाजिक भावनेतून येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब आणि जायंट क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक आणि टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष सयोजीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वमालिकेच्या खनीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम सलग ८ वर्षे …

Read More »

रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे सन्मानपूर्वक बसवली!

    बेळगाव : तब्बल दीड वर्षांनी बेळगाव मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे सन्मानपूर्वक बसवण्यात आल्याने शिवप्रेमी आणि भीमप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर अनेक महापुरुषांची शिल्पे बसविण्यात आली. मात्र जाणीवपूर्वक याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची …

Read More »

गौराई आली सोनपावलांनी!

  निपाणी परिसरात स्वागत : दिवसभर महिलांची लगबग निपाणी (वार्ता) : विघ्नहर्त्या गणरायाच्या प्रतिष्ठापणेनंतर गौरीची स्थापना केली जाते. त्यामुळे दोन दिवसांपासून स्वागताची तयारी केली होती. मंगळवारी (ता.१०) दिवसभर गौरीच्या आवाहनासाठी नदी, तलाव, जलकुंभ आणि विहिरीवर महिलांची लगबग दिसून आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह अनेक घरांत मुखवट्याच्या गौरी पुजल्या. या मुखवट्यावर सजावटीसाठी …

Read More »

खानापूर समितीच्यावतीने रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने रविवारी (ता. १५) शिवस्मारक येथे सकाळी अकरा वाजता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक व आदर्श शाळांचा सन्मान केला जाणार आहे. दरवर्षी समितीच्यावतीने मराठी माध्यमाच्या शिक्षकांचा सन्मान केला जातो. यावर्षीही शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या शिक्षक व …

Read More »

१५ सप्टेंबरपासून धावणार हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस!

    बेळगाव : हुबळी ते पुणे या मार्गावर १५ सप्टेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. त्यामुळे आता पुणे ते सांगली असा तीन तासांचा प्रवास फक्त ५५ मिनिटांमध्येच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात लवकर विधानसभा निवडणुका असल्यामुळे काही शहरात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी देशात १० वंदे …

Read More »

शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

  सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी बांधकाम विभागाच्यावतीने शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन आपटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी पहिल्यांदा चेतन पाटील त्यानंतर जयदीप आपटे याला अटक केली होती. आज त्या प्रकरणी सिंधुदुर्ग मधील न्यायालयात सुनावणी झाली होती. आजच्या सुनावणीत जयदीप …

Read More »

शिनोळी येथे ‘स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन शालेय जीवनात कसा वाढवावा’ या विषयावर प्रा. जॉर्ज क्रूझ यांचे सखोल मार्गदर्शन

  शिनोळी (रवी पाटील) : शिनोळी येथील समाज मंदिर येथे ‘शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन कसा वाढवावा’ या विषयावर एक सखोल मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्ते प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे महत्त्व, पालकांची भूमिका आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिनोळी …

Read More »

१० सप्टेंबर- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन

  आत्महत्या म्हणजे “स्वतःचे जीवन संपवणे.” जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार दरवर्षी अंदाजे ८ लाख लोक आत्महत्या करतात व दर ४० सेकंदाला कोणीतरी स्वतःचे जीव घेत आहेत. आत्महत्या हे १५ ते २९ वयोगटातील लोकांसाठी प्रमुख कारण बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दरवर्षी १० सप्टेंबर “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस” म्हणून …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने करिअर मार्गदर्शन व मानसिक आरोग्य सत्र

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने वडगाव बेळगाव येथील श्री तात्यासाहेब मुसळे हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन व मानसिक आरोग्य सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कोमल कोल्लीमठ उपस्थित होत्या. त्यांनी हे सत्र अतिशय सुरळीतपणे पार पाडले. सत्र अतिशय माहितीपूर्ण होते. त्या सत्राचा विशेषाधिकार …

Read More »