Friday , June 19 2026
Breaking News

कुत्र्याचा जीव वाचवताना आईचा दुर्दैवी अंत; मुलासमोरच घडली हृदयद्रावक घटना

Spread the love

 

बेळगाव : रस्ता ओलांडणाऱ्या एका भटक्या कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एका आईला स्वतःचा जीव गमवावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी घटना गुरुवारी सांबरा गावाजवळ घडली. मुलासोबत दुचाकीवर प्रवास करत असताना अचानक झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, पंत बाळेकुंद्री येथील महंतेश कलमठ हे आपल्या आई शांताव्वा कलमठ यांना दुचाकीवर घेऊन महांतेशनगरकडे निघाले होते. सांबरा गावाजवळ पोहोचताच एक भटका कुत्रा अचानक दुचाकीसमोर आला. त्याला धडक लागू नये म्हणून महंतेश यांनी क्षणार्धात जोरात ब्रेक लावला.
मात्र, अचानक बसलेल्या धक्क्यामुळे मागे बसलेल्या शांताव्वा यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी आईसोबत प्रवास करणाऱ्या मुलाच्या डोळ्यांसमोर ही दुर्घटना घडल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाची नोंद मारिहाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
एका मुक्या जीवाला वाचवण्याचा प्रयत्न करताना आईचा जीव जाण्याची ही घटना सर्वांनाच चटका लावणारी ठरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

लिव्ह-इनमधील प्रेयसीची शिक्षकाकडून निर्घृण हत्या; मृतदेह तिलारी घाटातील जंगलात फेकल्याचा आरोप

Spread the love  बेळगाव : दहा वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्याच साथीदाराने दुसऱ्या विवाहाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *