बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दिनांक २२ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी निघणाऱ्या या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 6 वाजता अनगोळ, मजगाव, पिरनवाडी, मच्छे भागात जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली आहे.
अनगोळ येथील कलावती आई मंदिर व हरिमंदिर परिसरातून होणार आहे. त्यानंतर फेरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, अनगोळ येथे पोहोचेल. पुढे अनगोळ गावातील विविध भागांतून जनजागृती करत ही फेरी मजगावकडे मार्गस्थ होईल. मजगावातील विविध परिसरांतून फिरल्यानंतर फेरी पिरनवाडी येथे जाईल. पिरनवाडीमधून पुढे मच्छे गावात पोहोचून तेथील विविध भागांत जनजागृती करण्यात येईल. अखेरीस मच्छे येथे या जनजागृती फेरीची सांगता होईल.
मराठी भाषेच्या रक्षणासाठी आणि मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी सर्व मराठी बांधवांनी या जनजागृती फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
टीप : सर्वांना विनंती आहे की उद्या ज्या भागात जणजागृती आहे त्या त्या भागाच्या कार्यकर्त्यांना संपर्क सर्वांनी करायचं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta