बेळगाव : बंगळुरू येथील झी स्विम अकॅडमी, व्हाईटफिल्ड येथे ८ ते १० जून दरम्यान झालेल्या २६व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धा २०२६ मध्ये स्विमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करत बेळगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. क्लबच्या १४ पॅरा जलतरणपटूंनी एकूण ३६ पदकांची कमाई केली असून त्यामध्ये १० सुवर्ण, २३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.
देशातील ३० राज्यांतील ४५० हून अधिक पॅरा जलतरणपटूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत स्विमर्स क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कर्नाटक संघाला जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळविण्यातही मोलाचे योगदान मिळाले.
पदक विजेते खेळाडू
साक्षी पाटील – ३ सुवर्ण
आकाश हांजी – २ सुवर्ण, १ रौप्य
अनिकेत पिलणकर – १ सुवर्ण, २ रौप्य
रम्या लामाणी – १ सुवर्ण, २ रौप्य
समर्थ चंद्रगी – १ सुवर्ण, २ रौप्य
रक्षित बागेवाडी – १ सुवर्ण, २ रौप्य
प्रज्वल हणमणट्टी – १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य
बुश्रा मुजावर – ३ रौप्य
चिन्मय क्यामण्णावर – ३ रौप्य
पार्थ दाणोजी – ३ रौप्य
अमोघ तांगडी – १ रौप्य, १ कांस्य
कविता माडीवाल – १ रौप्य, १ कांस्य
लावण्या कोत्रण्णावर – १ रौप्य
मंदार कट्टीमनी – १ रौप्य
हे सर्व खेळाडू केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावात वरिष्ठ प्रशिक्षक उमेश कळघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. तसेच प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि इतर प्रशिक्षकांचेही या यशामध्ये मोठे योगदान आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, डॉ. प्रभाकर कोरे आणि विविध मान्यवरांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta