Sunday , August 23 2026
Breaking News

एसआयआर प्रक्रियेत सकल मराठा समाजाचे आवाहन; मतदारांनी माहिती वेळेत सादर करण्याचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR – Special Intensive Revision) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज, बेळगावच्या वतीने समाजातील सर्व मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकल मराठा समाजाचे समन्वयक किरण जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक सरकारच्या वतीने राज्यभर मतदार याद्यांचे डिजिटल मॅपिंग सुरू असून प्रत्येक मतदाराची वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती आणि पत्त्याची अचूक नोंदणी केली जात आहे.

या प्रक्रियेत समाजातील एकही नागरिक वंचित राहू नये. भविष्यात मतदानाचा हक्क बजावताना किंवा विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी आवश्यक माहिती वेळेत सरकारी प्रतिनिधींकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके

Spread the love  बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *