Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

वन्यजीव हत्यांवर कठोर कारवाई होणार; मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  वन्यजीव सप्ताहाचा समारोप बंगळूर : राज्यात वन्यजीवांच्या हत्यांबाबत वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर इशारा दिला आहे. “वाघ, हत्ती किंवा कोणत्याही वन्यजीवांचा जीव घेणाऱ्यांविरुद्ध सरकार कठोर कायदेशीर कारवाई करेल,” असे ते बुधवारी म्हणाले. चामराजनगर जिल्ह्यातील माले महाडेश्वर टेकड्यांमध्ये दोन वाघ आणि चार पिल्लांना विषबाधा झाल्याची तसेच रामनगर जिल्ह्यातील चन्नपटण …

Read More »

निपाणी परिसरात शेतकरी बांधवातर्फे भूमी पौर्णिमा उत्सव साजरा

  निपाणी (वार्ता) : दसऱ्यानंतर शेतकरी बांधव भूमिपूजनाचा उत्सव साजरा करतात. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.८) हा कार्यक्रम पार पडला. सकाळी आठ वाजल्यापासूनच या कार्यक्रमाची शेतकऱ्याकडून तयारी सुरू झाली होती. वर्षभर अन्न पुरवणाऱ्या भूमी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आले. आधुनिकतेच्या युगातही शेतकरी अजूनही त्यांच्या शेतांवर अवलंबून आहेत. भूमी पूजन म्हणजे अन्न …

Read More »

पाकाळणी कार्यक्रमाने बाबा महाराज समाधीस अभिषेक घालून निपाणी उरुसाची सांगता

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित श्री. महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब(क. स्व) यांचा उरूस उत्सव शांततेत पार पडला. बुधवारी (ता.८) चव्हाण वाड्यातून चव्हाण वारस श्रीमंत रणजित देसाई -सरकार, श्रीमंत संग्राम देसाई -सरकार, श्रीमंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्गाह आणि बाहेरील …

Read More »

सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध

  खानापूर : सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. या संदर्भात खानापूर तहसीलदारांना वकील संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. दिल्ली येथील वकील राकेश किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान भारताचे मुख्य सरन्यायाधीश माननीय श्री. बी. आर. गवई यांच्या दिशेने पायातील जोडे …

Read More »

हायटेक बसस्थानकावरील मराठी ‘निपाणी’ शब्द गाळला!

  मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी ; कन्नड सक्तीचा जोर कायम निपाणी (वार्ता) : कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या निपाणी शहरातील हायटेक बसस्थानकावर मराठी फलक पुन्हा एकदा गायब झाला असून मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जुन्या बसस्थानक इमारतीवर मराठीत ‘निपाणी’ असे नाव ठळक अक्षरात लिहिले होते. मात्र, नवीन हायटेक बसस्थानक निर्मितीवेळी …

Read More »

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात पाच टक्के वाढ

  बंगळूर : राज्य सरकारने एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क वाढवण्याचा आदेश जारी केला आहे. कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने २०२५-२६ या वर्षासाठी परीक्षा शुल्कात ५ टक्के वाढ करण्याचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, २०२५-२६ या वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षांचे शुल्क सध्याच्या दरात ५ टक्के वाढवून आकारले जाईल. २०२५-२६ या …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; नेतृत्व अबाधित असल्याचा संदेश

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत दिले असून, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाबाबत कोणतीही अनिश्चितता नसल्याचा ठोस संदेश त्यांनी काँग्रेस पक्षात दिला आहे. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त बंगळूर येथील आमदार भवनात वाल्मिकी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “भविष्यात मंत्रिमंडळात फेरबदल केले …

Read More »

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी आमदार साहेबांच्या सोबत उभी असेन : डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते हब्बनहट्टी येथे वाल्मिकी मंदिराचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकू नाईक तर स्वागताध्यक्ष नागोजी पाटील हे होते. जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथे हे एकमेव वाल्मिकी मंदिर उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार अंजलीताई …

Read More »

राज्यातील 27 पोलीस उपअधीक्षक व 131 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

  बेळगाव : राज्यातील 27 पोलीस उपअधीक्षक व 131 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी सायंकाळी राज्य सरकारने बदल्यांचा आदेश जारी केला असून यामध्ये बेळगाव शहर व जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांची कर्नाटक लोकायुक्त विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर संतोषकुमार डी. यांची …

Read More »

सरकारी आणि अनुदानित शाळांची दसऱ्याची सुट्टी 18 ऑक्टोबरपर्यंत वाढविली

  बंगळूर : राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांना दसऱ्याची सुट्टी आता १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कायमस्वरूपी मागासवर्ग आयोगातर्फे राज्यात सुरू असलेले सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण काही ठिकाणी अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील …

Read More »