Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक

बाळगुंद गावाला जोडणारा रस्ता मार्गी लावा

बैठकीत नागरीकांची मागणी खानापूर (प्रतिनिधी) : बाळंगुद तालुका खानापूर येथे गुरुवारी हिंदू धर्म जनजागृती व विकास योजना मार्गी लावण्यासाठी खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी खानापूर तालुका भाजपा नेते पंडित ओगले उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी बाळगुंद गावाला जोडणार्‍या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देतााना …

Read More »

बेकवाड येथे पौष्टिक आहार शिबिर संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड तालुका खानापूर येथे गुरुवार दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मराठा मंडळ हायस्कूल बेकवाड येथील सभागृहात तहसील कार्यालय, बालविकास व महिला शिष्य अभिवृध्दी व तालुका आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक आहार शिबीराचे आयोजन पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव होते. …

Read More »

पंतप्रधान मोदीच्या वाढदिवसानिमित्त खानापूरातून पत्राव्दारे शुभेच्छा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने शुक्रवारी दि. 17 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 71 व्या वाढदिवासाचे औचित्य साधुन खानापूर येथील रेल्वे स्टेशन रोडवरील पोस्ट ऑफिसमधून खानापूर तालुका भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आदीनी पोस्ट पत्राव्दारे शुभेच्छा पाठविल्या. यावेळी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते …

Read More »

आंबा मार्केटमध्ये रस्त्यासह सुविधा द्या

माजी नगरसेवक जुबेर बागवान : पालिका पदाधिकार्‍यांना निवेदन निपाणी : येथील आंबा मार्केटमध्ये बर्‍याच वर्षापासून भाजीपाला व फळमार्केट भरत आहे. शहरासह ग्रामीण भागातील व्यापारी व शेतकरी खरेदी-विक्रीच्या निमित्ताने येतात. पण दरवर्षी पावसाळ्यात दलदल निर्माण होऊन सर्वांची गैरसोय होत आहे. शिवाय विक्रीसाठी आलेला माल चिखलात ठेवावा लागत असल्याने दर कमीजास्त मिळत …

Read More »

कोगनोळीजवळ ट्रक पलटी!

सुदैवाने जीवितहानी नाही कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या कोगनोळी (ता. निपाणी) येथील आरटीओ कार्यालयाजवळ ट्रक पलटी झाला. ही घटना शुक्रवार दि. 17 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अशोक लेलँड ट्रक क्रमांक (टी.एन.13 टी. 2412) हा ट्रक चेन्नईहून मुंबईकडे काचा घेऊन जात …

Read More »

कोगनोळी येथील शेतकर्‍यांनी मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांना दिले निवेदन

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण होणार असून या ठिकाणी शेकडो एकर जमीन यामध्ये जाणार आहे. या ठिकाणी सहापदरीकरण रस्त्याला येथील शेतकर्‍यांचा विरोध नसून या ठिकाणी होणार्‍या अन्य ऑफिस व मॉल आधी गोष्टींना विरोध असल्याचे मनोगत ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने यांनी व्यक्त केले. मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले …

Read More »

खड्ड्यामुळे गर्लगुंजी-नंदिहळ्ळी रस्त्याची दुर्दशा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासुन ते नंदिहळ्ळी गावापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन धारकांना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होत आहे. त्याचबरोबर खानापूर-गर्लगुंजी-नंदिहळ्ळी बससेवाही रस्त्याची दुर्दशा झाल्याने व रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने सुरळीत धावत नाही. त्यामुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक …

Read More »

खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे पीजीआर सिंधिया यांची भेट

खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या सदस्यांनी नुकतीच माजी मंत्री पीजीआर सिंधिया यांची बेंगळुरू मुक्कामी भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या विविध समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेला असून या समाजाला विविध स्तरावर आरक्षण मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच माजी मंत्री पीजीआर सिंधिया यांनी …

Read More »

वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर आ. अंजली निंबाळकरांनी उठवला आवाज!

बेळगाव : कोरोना संकटाच्या काळातही नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आकारल्याच्या मुद्द्यावर खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला. वाढीव वीजबिलांच्या शॉकने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चेवेळी खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांनी वाढीव वीजबिलांच्या …

Read More »

हदनाळ-म्हाकवे परिसरात जोडप्याचा सहा जणांना गंडा

बनावट मोबाईल विक्री करुन फसविले, कारवाईची मागणी कोगनोळी : पती-पत्नी आणि गुंगीचे औषध दिलेले लहान मूल घेऊन आणि सावज हेरुन बनावट मोबाईल विकले जात आहेत. आतापर्यंत हदनाळ, म्हाकवे आणि परिसरात सहा जणांना गंडा घातला आहे. यामध्ये दोन पत्रकारांचाही समावेश आहे. बदनामीसाठी कोणीही पुढे आलेले नाही हे विशेष. त्यामुळे नागरिकांनी सतर्क …

Read More »