Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

संकेश्वरात शनिवारी श्री हनुमान मंदिर उद्घाटन सोहळा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी. बी. रोड यशागोळ काॅलनीत नव्याने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिर वास्तूशांती व उद्घाटन सोहळा हनुमान जयंती दिनी शनिवार दि. १६ एप्रिल २०२२ रोजी होत असल्याची माहिती चंद्रशेखर यशागोळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. ते म्हणाले यशागोळ काॅलनीत उभारण्यात आलेल्या पवनपुत्र मंदिराचे उद्घाटन हनुमान जयंतीला …

Read More »

गोकाकच जिल्हा होणार : रमेश जारकीहोळी

संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव जिल्ह्याचा विस्तार वाढला आहे. कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगांवचा उल्लेख केला जातो. बेळगांव जिल्हा विभाजनात प्रामुख्याने गोकाकचा नामोल्लेख केला जात असल्याने गोकाकच जिल्हा होणार यात तिळमात्र शंका नसल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते संकेश्वरला धावती भेट देऊन शिवकृपा कार्यालयात पत्रकारांशी …

Read More »

जत्राटमध्ये १७ रोजी सामाजिक संघर्ष परिषद

भरत कांबळे यांची माहिती : रामदास आठवले यांची उपस्थिती निपाणी (वार्ता): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.१७) सकाळी दहा वाजता जत्राट येथे सामाजिक संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती भरत कांबळे यांनी दिली. बुधवारी (ता.१३) …

Read More »

गृहमंत्री ज्ञानेंद्र, भाजप मुख्य सचिव सी. टी. रवी यांच्यावर गुन्हे दाखल करा

काँग्रेसतर्फे मागणी : शहर पोलिसांना निवेदन निपाणी (वार्ता) : बंगळूर येथे घडलेल्या घटनेवरून खरी माहिती न घेताच राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र व भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव सी. टी. रवी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे समाजामधील शांतता भंग पावली आहे. शिवाय जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. दोघांचे वक्तव्य निंदनीय असून …

Read More »

अबणाळीत पांडुरंग अखंडनाम सप्ताहाला प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : अबणाळीत (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही पांडुरंग अखंडनाम सप्ताहाला मंगळवारी दि. 12 रोजी प्रारंभ झाला. सकाळी पोथी स्थापना होऊन कार्यक्रमाला सुरूवात झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिताराम राणे होते. यावेळी कार्यक्रमाला लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, …

Read More »

खानापूर तहसील कार्यालयसमोर सापडले दोन दिवसाचे अर्भक

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील आंब्याच्या झाडाखाली एका पिशवीत दोन दिवसाचे मुलीच्या जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दि. 12 रोजी सकाळी तहसील कार्यालयासमोरी आंब्याच्या झाडाखाली प्लास्टिक पिशवीत अर्भक असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी संबंधित सरकार दवाखान्यात चौकशी केली. मात्र प्रथम पोलीस स्थानकात तक्रार …

Read More »

वडेबैलात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : वडेबैलात (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही रविवारी दि. 10 रोजी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी रविवार पहाटे हभप गंगाराम नांदुरकर, यडोगा यांच्या अधिष्ठानाखाली सोहळ्याला प्रारंभ होऊन सकाळी पोथी स्थापना, पुजा, आरती, सामुहिक भजन होऊन यावेळी ज्ञानेश्वरीचे वाचन करण्यात आले. दुपारी तुकारामांच्या गाथावरील भजन, प्रवचन, …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेने पार पाडावी : प्रल्हाद चन्नगिरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर तसेच ग्रामीण भागात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांची रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यात पार पडलेल्या शांतता कमिटीच्या सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

2 मे रोजी दहावीचा निकाल; शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांची महिती

बेंगळुर : राज्यात एसएसएलसी परीक्षा सुरळीत पार पडल्या असून आता या परीक्षेच्या निकालाकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. या परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विजापूर दौर्‍यावर आलेले शिक्षणमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत …

Read More »

मंत्र्यांनी कमिशन मागितल्याचा आरोप करणार्‍या बेळगावच्या कंत्राटदाराची आत्महत्या

बेळगाव : राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्यावर 40 टक्के कमिशनचा आरोप करणार्‍या कंत्राटदाराने उडुपी येथे लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला मंत्री ईश्वराप्पा हेच जबाबदार असून माझ्या पत्नी व मुलांना संरक्षण द्या. त्यांची काळजी घ्या मदत करा, असेही त्यांनी मृत्यूपूर्वी माध्यमांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले …

Read More »