Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

ऊसाचे ट्रॅक्टर रिप्लेक्टरविना!

अपघाताला निमत्रंण : ट्रॉलीला धडकून अनेकांनी गमावले प्राण निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील अनेक साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. सर्वच रस्त्यावर रात्री अपरात्री ट्रॅक्टरद्वारे ऊसाची वाहतूक सुरू आहे. अनेक वेळा पोलिसांनी आवाहन करूनही निपाणी भागात बहुसंख्य ट्रॅक्टर हे रिप्लेक्टर शिवाय धावताना दिसत आहेत. या निष्काळजीपणामुळे अनेक दुचाकीस्वारांना प्राणांना …

Read More »

सर्जा-राजा पुन्हा धावणार!

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याचा जल्लोष : सीमाभागात उडणार धुरळा निपाणी (विनायक पाटील) : मागील सात वर्षापासून बंदी असलेल्या बैलगाडी शर्यतीला कर्नाटक शासनाने महिन्यापूर्वी परवानगी दिली होती. पण महाराष्ट्रात परवानगी नसल्याने त्या भागातील बैलगाडा येणे कठीण झाले होते. आता महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही शर्ती व अटीवर …

Read More »

मुलगा असो वा मुलगी 21 व्याच वर्षी लागणार हळद

सर्वच स्तरावरुन निर्णयाचे स्वागत : मुलींना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळणार संधी निपाणी (वार्ता) : मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कायद्यात दुरुस्ती होणार असून मुलीचे वय 21 वर्षे झाल्याशिवाय लग्न लावणे कायद्याने उल्लंघन होणार आहे. या निर्णयाचे निपाणी तालुक्यातून …

Read More »

बेळगावात सुवर्णसौध बांधण्याचा उद्देश फसला : कुमारस्वामी यांची कबुली

बेळगाव (वार्ता) : ज्या कारणासाठी बेळगावात सुवर्णसौध उभारली, अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला तो उद्देश सफल झालेला नाही अशी कबुली माजी मुख्यमंत्री व जेडीएस अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. अधिवेशनात भाग घेण्यासाठी मंगळवारी बेळगावात आल्यावर कुमारस्वामी यांनी चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जेडीएस नेते …

Read More »

धर्मांतर बंदी विधेयकावरून विधानसभेत काँग्रेस आक्रमक, आमदारांनी केला सभात्याग

धर्मांतर विरोधी विधेयकावर आज होणार चर्चा बेळगाव (वार्ता) : गेल्या महिन्यापासून चर्चेत असलेल्या धर्मांतर बंदी कायदा विधेयक आज मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सत्ताधारी पक्षाने आडमार्गाने सदनात विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या विधेयकाला आमचा विरोध आहे असे सांगून संताप व्यक्त केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी …

Read More »

कर्नाटकमध्ये पुन्हा नेतृत्वबदल होणार?

मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्काला उधाण! बेंगळुरू : काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतलेल्या बसवराज बोम्माई यांची पदावरून उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 28 जुलै रोजी बसवराज बोम्माई यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या उचलबांगडीनंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारली होती. मात्र, आता …

Read More »

कन्नड भाषा शिकायला हवी : अमर नलवडे

संकेश्वर (वार्ता) : आपण कर्नाटक राज्यात राहत असल्याने येथील कन्नड भाषा लिहायला, वाचायला शिकायला हवी असल्याचे संकेश्वर मराठा समाज सोसायटीचे अध्यक्ष अमर नलवडे यांनी सांगितले. ते सोसायटीच्या 14 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित मराठा समाजाती दहावी-बारावी परिक्षेची व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्काराने सन्मान करुन बोलत होते. उपस्थितांचे स्वागत जयप्रकाश सावंत यांनी …

Read More »

निपाणी येथे कडकडीत बंद, अभूतपूर्व मूकमोर्चा

निपाणी तालुक्यातील अनेक गावात बंद : पुतळा विटंबनेचा निषेध निपाणी : छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याच्या विटंबने निषेधार्थ येथील सर्वपक्षीय नेते मंडळी, कार्यकर्ते व नागरिकांनी सोमवारी (ता. 20) शहरात मूकमोर्चा काढला. त्यामध्ये शहरातील दहा हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर दोन्ही घटनेतील दोषींवर कारवाई करण्याच्या …

Read More »

हलशी येथे बसवाण्णा महाराजांच्या फोटोची विटंबना

खानापूर (वार्ता) : बेळगाव : कर्नाटकाची राजधानी बेंगळूरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि अनगोळातील वीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा विटंबनेवरून निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण हळूहळू थंड होत असतानाच खानापूरात जगज्योती बसवेश्वरांच्या फोटोची आणि लाल-पिवळ्या ध्वजाची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक हलशी गावात लाल-पिवळा जाळून …

Read More »

राज्याच्या हिताविरोधात असणार्‍यांवर देशद्रोहाची कारवाई करणार : मुख्यमंत्री बोम्माई

बेळगाव (वार्ता) : बेळगाव सीमाभागात सातत्याने अशांतता मोजवण्याचे काम म. ए. समिती करत आहे. म. ए. समिती राज्याच्या विरोधात कारवाया करत आहे. राष्ट्रपुरुषांचा अपमान केला जात आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्याच्या हिताचा विरोधात काम करणार्‍यांविरोधात देशद्रोहाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आज …

Read More »