Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूरात पीडब्ल्यूडी खात्याकडून गाळे काढले, आमदारांची सुचना डावलली

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी वर्गणी काढून 51 गाळे आमदारांच्या सांगण्यावरून उभारण्यात आले होते. मात्र महिन्यातच गाळे काढण्यासाठी पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी व त्यांचे सहाय्यक अभियंते सोमवारी जेसीबी घेऊन गाळे काढण्यासाठी आले. यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर तसेच माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारक पीडब्ल्यूडी …

Read More »

खानापूर युवा समितीकडून होणार शिक्षकांचा सत्कार

बेळगाव : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक प्राप्त खानापूर तालुक्यातील शिक्षकांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर शिवस्मारक येथे उद्या शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी ठीक चार वाजता सत्कार आयोजित करण्यात आला आहे, नंदगड येथील आनंदगड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण मल्लाप्पा देसाई गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदानंद पाटील ढेकोळी …

Read More »

बेळगाव-खानापूर-रामनगर महामार्गावर लवकरच तिन्ही भाषेत फलक

खानापूर (वार्ता) : बेळगाव ते खानापूर आणि अनमोडपर्यंतच्या रस्त्यावर तिन्ही भाषेतील फलक लावण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांनी दिले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी पोतदार यांची भेट घेऊन खानापूर ते रामनगर रस्त्याचे काम आणि फलक …

Read More »

कोगनोळीत आरोग्य शिबिरात 166 रुग्णांची तपासणी

कोगनोळी : येथील प्रजावणी फाऊंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी नारायण बिरू कोळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रजावणी फाऊंडेशन व सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने धनगर समाज सामुदायिक भवन येथे सर्व आजारावरील आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिरात, कोगनोळी पंचक्रोशीतील 166 नागरिकांनी सहभागी होऊन तपासणी करुन घेतली. अरुण पाटील यांनी स्वागत …

Read More »

चांगल्या गुणांचा वापर समाजासाठी करावा

इस्माईल पटेल : निपाणी रोटरी, इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा निपाणी : रोटरी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था समाजासाठी निरंतरपणे कार्यरत आहे. समाजसेवा हेच या संस्थेचे ध्येय आहे. आयुष्यात अनेक अडचणी येत असतात त्यांचा सामना करत निश्चित ध्येय गाठणे आवश्यक आहे. याबरोबरच आपल्या अंगातील चांगले गुण आणि सवयी हेरून त्याचा समाजासाठी वापर करावा, …

Read More »

’रवळनाथ’मुळेच सीमावासियांची घरबांधणीची अडचण दूर

प्राचार्य डॉ. कोथळे : सभासद, यशवंत पाल्यांचा गौरव निपाणी : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या सहज, सुलभ व कमी व्याजदरातील अर्थसहाय्यामुळेच सीमाभागातील रहिवाश्यांची घरबांधणीची अडचण दूर झाली आहे, असे मत प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे यांनी व्यक्त केले. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सतर्फे आयोजित वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या आणि विविध …

Read More »

बेंगळूरमध्ये आणखी एक स्फोट; 3 जणांचा जागीच मृत्यू

बेंगळूर : गुरूवारी दुपारी बेंगळुरूच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात फटाके साठवलेल्या दुकानात स्फोट झाल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. ही घटना रात्री 11.45 च्या सुमारास टायर पंक्चर दुकानात घडली. या स्फोटामुळे दुकानाजवळ उभ्या असलेल्या सुमारे 10 मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे. फयाज (वय 50), मनोहर (वय 29) आणि …

Read More »

गर्लगुंजी लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी संस्थेकडून २ लाखाची देणगी सुपूर्द

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार करण्यात येत असल्याने श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी संस्थेच्या मुख्याधिकारी विरेंद्र हेगदे यांच्या सुचनेवरून गर्लगुंजी लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी दोन लाख रूपयाचा धनादेश खानापूर श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी योजनेचे अधिकारी प्रदिप शेट्टी, संदिप नाईक, सदानंद आर यांच्याकडून श्री …

Read More »

गांजा विक्री करणार्‍या दोघांना अटक

दीड किलो गांजा जप्त : यरनाळ जवळ कारवाई निपाणी : गांजा विक्रीसाठी नेणार्‍या दोघांना निपाणी पोलिसांनी बुधवारी अटक केली. सोहेल शब्बीर देसाई (वय 26, रा. बादलवाले प्लॉट, निपाणी), हमीद सलीम शेख (वय 21, रा. शिवाजीनगर, निपाणी) अशी अटक केलेल्या संशयितांची नांवे आहेत. संशयितांकडून पोलिसांनी दीड किलो गांजा व मुद्देमाल जप्त …

Read More »

जांबोटी -चोर्ला रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, अपघाताला आमंत्रण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटीपासून चोर्लापर्यंतच्या महामार्गावर यंदाच्या मुसळधार पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे जांबोटीपासून ते चोर्लापर्यंत जाणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनांना वाहन चालविणे तारेवरची कसरत होत आहे. अशातच खड्डा चुकविण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण होत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे. मागील वेळी माती टाकून खड्डे …

Read More »