Sunday , September 20 2026
Breaking News

राजगोळी खुर्द येथे क्रांती दिनानिमित्त “एक पुस्तक शाळेसाठी दान” उपक्रम, २७१ पुस्तके जमा

Spread the love

 

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द. (ता चंदगड) येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने “एक पुस्तक गावासाठी” माजी सैनिक सत्कार व क्रांती दिन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. बी. कवठेकर यांनी केले. ग्रंथ दिंडी पूजन लेखनिक महादेव तोंडले यांच्या हस्ते झाले, ज्योत प्रज्ज्वलन माजी सैनिक मनोहर दड्डीकर यांच्या हस्ते झाले. श्रेया गुरव व श्रावणी भांदुर्गे या विद्यार्थिनिंनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगत श्री. इनामदार यानी केले. या
या प्रसंगी गावात वाचन संस्कृती सुरू व्हावी म्हणून ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून “एक पुस्तक शाळेसाठी” हा अभिनव उपक्रम, मुकुंद दास भजनी मंडळाच्या सहकार्याने संपन्न झाला. या उपक्रमाला गावातून अतिशय अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. या ग्रंथ दिंडीमध्ये शालेय ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी गावातील अनेकांनी 271 पुस्तके देणगी स्वरूपात दान केली. यामध्ये भगवतगीता, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, शब्दकोश, शिवचरित्र, कथा, जीवनचरीत्र, अशी विविध स्वरूपातील नामवंत ग्रंथ व पुस्तके दान स्वरूपात मिळाली. समाजातील सर्वच घटक, संस्था, ग्रामस्थ , शाळेतील सर्व कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या सहकार्यातुन सदर कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. मुराबट्टे, बी. बी. पाटील, एम. जे. पाटील, शिवाजी कडोलकर, बसवानी भोसले, मुकुंद दास भजनी मंडळ या सर्वांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन श्री. के. ए. पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

Spread the love  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *