खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र आहांकार उडला आहे. यासाठी सर्वथरातून औषध वितरण करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे पारिश्वाड (ता. खानापूर) येथे तालुका भाजप व डॉ. संजीव कुलकर्णी वैद्यकीय केंद्राच्यावतीने कोविड- १९ प्रोफेलेक्सिस औषध किटचे वाटप शुक्रवारी दि. ११ रोजी करण्यात आले.
या किट्समध्ये व्हिटॅमिन सी गोळ्या, आर्सेनिक अल्बम होमिओपॅथीक गोळ्या इम्युनिटी बूस्टर थेंब आयुर्वेदिक औषध आदीचे वितरण करण्यात आले.
यावेळी संजीवा कुलकर्णी वैद्यकीय उत्कृष्ट संयोजक डॉ. गुरू कोथिना, तालुका भाजपा अध्यक्ष संजस कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, श्री महालक्ष्मी ग्रुप संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजप नेते सुभाष गु़ळशेट्टी, जिल्हा प्रवक्ते संजय कंची, गुंडू तोपिनकट्टी, सुरेश देसाई, भाजप युवामोर्चा अध्यक्ष दर्शन किल्लारी, दशरथ बनोशी, सिध्दू पाटील, मारूती उन्मतगोळ, वसंता कोलकार, नागेंद्र चौगुला, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले की, प्रत्येकाने कोरोनावर मात करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन सॅनिटायझर आदीचा वापर करुन प्रशासनाच्या नियमाचे पालन करावयाचे आहे. असे सांगितले.
