खानापूर : परीट समाजातर्फे खानापूर येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी व हळदी कुंकू समारंभ 20 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
सदर समारंभ राजा शिवछत्रपती स्मारक येथे घेण्यात आला. कार्यक्रमास डॉ. सोनाली सरनोबत या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
परीट (मडीवाळ) समाजाच्या महिलांच्या वतीने भाजपा नेत्या सोनाली सरनोबत यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सरनोबत यांनी बोलताना संत गाडगेबाबा यांच्या कार्याची माहिती सांगितली. गाडगेबाबांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची तसेच अंधश्रद्धेच्या विरोधातील त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
परीट समाजाला शासकीय अनुदान मिळावे यासाठी परीट समाजाने निवेदन दिले. डॉ. सोनाली सरनोबत यांनी परीट समाजाला शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी खानापूर शहराचे नगराध्यक्ष नारायण मयेकर यांच्यासह संतोष परीट, लक्ष्मण पाळेकर, नागेश मडीवाळ, श्रीकांत शिंदे, चंद्रभागा परीट, अनिता कोमस्कर आदी उपस्थित होते.