खानापूर : एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील गरजूंना मदत करण्यात येते तसेच शैक्षणिक शाळांना भेट देऊन त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची माहिती घेऊन शाळेला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरविण्यात येतात.
अशाच प्रकारे सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नंबर 7 येथे एंजल फाउंडेशन च्या वतीने चटईचे वितरण करण्यात आले. येथील शाळेमध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्याकरिता जमखाना किंवा चटईचा उपयोग व्हावा या उद्देशाने एंजल फाउंडेशनच्या वतीने शाळेला 150 चटई देण्यात आल्या.
याप्रसंगी चटई वितरणाच्या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके, एचएम संजय पाटील, शशिकला जोशी, मिलन पवार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षिका आणि कर्मचारी उपस्थित होते.