खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना २००६ पासून लागू झालेली नूतन पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत घातक योजना ठरली आहे. त्याच्या विरोधात बेंगलोर येथील फ्रीडम पार्क मध्ये राज्य एनपीएस संघटनेचे अध्यक्ष शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली लाखो संख्येच्या उपस्थितीत गेले तीन दिवस तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये खानापूर तालुक्यातील एनपीएस नोकर संघटनेने जोरदार मोर्चा करत आहे. या आंदोलनासाठी खानापूर तालुक्यातील विविध खात्यामध्ये सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांनी धनसहाय्य करून मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये भाग घेतला आहे. यावेळी खानापूर तालुका एनपीएस संघटनेचे अध्यक्ष रमेश कवळेकर यांनी आंदोलनासाठी सहकार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे आणि पुढील काळात पुन्हा मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले आहे.
या आंदोलनाला खानापूर तालुक्यातील ओपीएस शिक्षक बांधवांनीही मोठ्या प्रमाणात धन सहाय्य करून आंदोलनात सहभाग घेतला हे उल्लेखनीय ठरले आहे.
यावेळी कार्यदर्शी जी. पी. केरीमठ, कृष्णा कौंदलकर, बी. बी. चापगावकर, जे. पी. पाटील, एस. वाय. पाटील, किरण पाटील, प्रकाश शेटन्नावर, विठ्ठल बीळमरी, बसू नागलापुर, बापू दळवी, विनायक कुंभार, प्रकाश मादार, गोविंद पाटील, अजय काळे आदी शिक्षक व नोकर वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
कर्नाटक राज्य एनपीएस नोकर संघटनेचे अध्यक्ष शांताराम यांनी खानापूर एनपीएस टीमचे अभिनंदन केले आहे व सर्वांना संघटित राहण्याचे आवाहन केले आहे.