किरण निकाडे : सांस्कृतिक कार्यक्रमास प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक उपक्रम सातत्याने राबवून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी विज्ञान संमेलन उपयुक्त ठरत आहे. या वैज्ञानिक संमेलनामध्ये युवकांचे प्रबोधन होत असून त्यांच्यासाठी हे संमेलन प्रेरणादायी प्रेरणादायी ठरत आहे,असे मत हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक किरण निकाडे यांनी व्यक्त केले. ते कुर्ली येथील एचजेसी चिफ फौंडेशन्स ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समिती यांच्या वतीने आयोजित आठव्या ग्रामिण विज्ञान साहित्य संमेलन प्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.
एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. किरण निकाडे व अमोल माळी यांच्या हस्ते रोपास जलार्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. याप्रसंगी मुरारी बोते यांनी ग्रामीण धनगरीओवी व भारुड याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नम्रता पाटील, वैभव ढगे, अंजली अमृतसमन्नावर, राजेंद्र चौगुले, रणजित माने, टी. के. जगदेव, आनंदा ढगे, यु. पी. पाटील, यांचा सत्कार करण्यात आला. ओंकार भेंडूगळे या विद्यार्थ्यांने तबला वादन केले. त्याचे मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी विविध गाणी, अभिनय व सादर केले. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस. ए. पाटील, यु. पी. पाटील, डी. डी. हाळवणकर, आर. आर. मोहिते, टी. एम. यादव यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक बी. एस. पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा शोभा मगदूम, अनिता हुपरे, शुभांगी चव्हाण, शारदा शिंत्रे, सीताराम चौगुले, जी. टी. वैराट, व्ही ए. पुजारी, डी. एस. चौगुले, कमल चौगुले, कुमार माळी, बी. एस. हेरवाडे, यांच्यासह कुर्ली, आप्पाचीवाडी, भाटनांगनूर, हदनाळ, सौंदलगा येथील विद्यार्थी व पालक उपस्थित होते. केदार मगदूम व श्रुती शिंत्रे यानी सूत्रसंचालन केले. ए. ए.चौगुले यांनी आभार मानले.