खानापूर : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीतजास्त स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक असून येणार्या काळात महाराष्ट्र एकीकरण समिती अधिक सक्षमपणे लढा पुढे घेऊन जाईल, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात समितीच्या बळकटी करणावर भर देण्यात आल्याने हलशीवाडी येथे समितीचा मेळावा भरल्याचे चित्र पहावयास मिळाले.
हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्सच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे रविवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दीपक दळवी म्हणाले, बेळगाव तालुक्यातील सर्वजण एकत्र आल्यानंतर शहरामध्येही समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून खानापूर तालुक्यामध्येही सर्वांनी एकीचे प्रयत्न करावेत आणि समितीला बळ द्यावे.
माजी आमदार अरविंद पाटिल यांनी ग्रामीण भागातून अधिक चांगले क्रीडापटू निर्माण होणे आवश्यक असून खेळाडूंनी व्यसनापासून दूर रहावे असे मत व्यक्त केले.
तालुका समितीचे आबासाहेब दळवी, धनंजय पाटील आदींनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र एकीकरण समितीला बळ देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या माणिक देसाई, ग्राम पंचायत सदस्य दिनेश देसाई, अश्विनी देसाई तसेच क्रिकेटपटू संचित सुतार यांचा सत्कार करण्यात आला. मिलिंद देसाई यांनी प्रास्तविक केले तर रघुनाथ देसाई, विलास देसाई, वामन देसाई, पांडुरंग देसाई, साईश सुतार, राजन सुतार, शुभम देसाई, वैभव देसाई यांनी स्वागत केले.
यावेळी खानापूर तालुका समितीचे सचिव गोपाळ देसाई, निरंजन सरदेसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलिक कारलगेकर, ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील, पांडुरंग फोंडेकर, दिलीप पाटील, साहेब फौंडेशनचे सतीश कुगजी, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, नरशिंह जोशी, सुधीर देसाई, अनंत देसाई, नारायण पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे आदी उपस्थित होते.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …