Monday , September 21 2026
Breaking News

डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या अर्ज भरणार!

Spread the love

 

 

खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या मंगळवार दि.16/04/224 रोजी सकाळी 10.30 वाजता कारवार जिल्हाधिकारी कार्यालयात शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून काँग्रेसकडून त्याची जोरदार तयारी सुरू करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला लोकसभेची उमेदवारी मिळाली असल्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक महिला उमेदवाराला दिल्लीपर्यंत पोचविण्यासाठी सर्व मराठी भाषिक तसेच मराठा समाजाच्या नेत्यांनी राजकारण बाजूला सारत अंजली निंबाळकर यांना पाठिंबा देत बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *