Friday , November 6 2026
Breaking News

निडगलच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत माऊली स्पोर्ट्स क्लब उपविजेता

Spread the love

 

सागर कोलेकर यांना ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’; रोहन पाटील यांचे प्रायोजकत्व

गर्लगुंजी : श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स, निडगल यांच्या वतीने आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेत गर्लगुंजी येथील माऊली स्पोर्ट्स क्लबने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत आपल्या खेळाची छाप पाडली.

कर्णधार गणेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली माऊली स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी सांघिक समन्वय, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज देत संघाने उपविजेतेपद मिळवले.

दरम्यान, माऊली स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू सागर कोलेकर याने संपूर्ण स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ हा मानाचा पुरस्कार पटकावला. त्याच्या या वैयक्तिक यशामुळे संघाच्या कामगिरीला विशेष झळाळी मिळाली.

या स्पर्धेसाठी रोहन पाटील यांनी प्रायोजकत्व देऊन सहकार्य केले. माऊली स्पोर्ट्स क्लबच्या या यशाबद्दल गर्लगुंजी येथील ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि मित्रपरिवारातून कर्णधार गणेश देसाई, सागर कोलेकर व संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच भविष्यातही संघाने अशीच यशस्वी कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *