






खानापूर : खानापूर तालुक्यातील एका छोट्याशा मेरडा गावातील मातीतून सुरू झालेला हा प्रवास एका जिद्दी बापाच्या आणि त्याच्या लेकीच्या अथांग संघर्षाची गाथा आहे. वडील नामदेव मारूती पाटील यांनी वयाच्या अगदी लहान वयात वीट, सिमेंट आणि लोखंडी बारसोबत मैत्री केली. उन्हाळ्याचा कडक ऊन असो वा पावसाचा मारा, त्यांनी अंगाची लाही लावून गवंडी काम केले आणि महाराष्ट्रात आपले आयुष्य स्थिरावले. स्वतःच्या नशिबी शिक्षणाची फारशी पाने आली नाहीत, पण आपल्या मुलांच्या भविष्यात शिक्षणाचा सुवर्णकाळ फुलावा, यासाठी त्यांनी रात्ररात्र एक केली. माती आणि सिमेंटमध्ये हात माखत त्यांनी ज्या विटा रचल्या, त्याच कष्टांच्या पायावर आज त्यांच्या मुलीने यशाची गुढी उभारली आहे.
याच कष्टाळू आणि प्रामाणिक पित्याची गुणवंत कन्या डॉ. नेत्रा नामदेव पाटील यांनी राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कर्नाटक येथून फार्मसी पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मेरडासारख्या ग्रामीण भागातून येऊन वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञानासारख्या उच्च क्षेत्रात यश मिळवणे सोपे नव्हते, परंतु वडिलांच्या घामाचा प्रत्येक थेंब आणि आई सौ.लक्ष्मीबाई नामदेव पाटील यांच्या आशीर्वादाची शिदोरी सोबत घेऊन नेत्रा यांनी हा खडतर प्रवास पार केला. एका गवंड्याने शहरात इमारती उभ्या केल्या आणि त्याच कष्टांच्या आधाराने आपल्या लेकीला ज्ञानाच्या आणि यशाच्या आकाशाइतक्या उंच इमारती उभी करण्याचे बळ दिले.
आज जेव्हा आपण डॉ. नेत्रा एन. पाटील यांच्या शिरपेचात ‘डॉक्टरेट/पदवी’ चा मान पाहतो, तेव्हा मागे उभी असलेली नामदेवराव महाराजांचा ती मजुरीची वर्षे आणि हातावर पडलेले फोड डोळ्यांसमोर येतात. लेकीच्या हातात पदवीचे प्रमाणपत्र पाहताना त्या बापाच्या डोळ्यात आलेले आनंदाचे अश्रू हे त्यांच्या अथांग कष्टांची साक्ष देतात. गरिबीच्या अंधारातही शिक्षणाचा दीप तेवत ठेवणारा हा बापाचा संघर्ष आणि लेकीचे यश केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण गावाची मान अभिमानाने ऊर भरून येणारी एक भावूक करणारी प्रेरणादायी कथा आहे!
Belgaum Varta Belgaum Varta