


मुंबई : बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर दिली.
प्रदीप रावत यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतील अश्वत्थामा भूमिकेतून केली. ऐतबार चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अग्निपथ, पत्थर के फूल, कोयला, सरफरोश, लगान यांसह अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.
2008 मधील गजनी चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांच्या दमदार अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी कौतुक केले.
अभिनेत्री रोशनी अचरेजा यांनी सांगितले की, प्रदीप रावत गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
अभिनेते सोनू सूद यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत, “प्रदीप रावत भाऊ, तुमची उणीव कायम जाणवत राहील,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

Belgaum Varta Belgaum Varta