Sunday , September 20 2026
Breaking News

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, पहिल्या टप्प्यात 12 मंत्र्यांना दिली जाणार शपथ

Spread the love

 

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राला नवीन मंत्रिमंडळ कधी मिळणार? याची प्रतिक्षा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला. येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले. प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही गटातील मंत्र्यांचा समावेश असणार आहे.
25 जुलैपासून राज्यात पावसाळी अधिवेशन आहे. त्यापूर्वी या दहा ते 12 मंत्र्यांना राज्याच्या कारभाराची आणि प्रश्नांची माहिती व्हावी. त्यामुळे 20 जुलै रोजी मंत्रिमंडळचा विस्तार असेल. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. त्यानंतर एकदिवसाच्या गॅपनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 20 जुलै रोजी होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील पाच ते सहा मंत्र्यांना तर भाजपच्या सहा ते सात मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशाननंतर मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 19 जुलैपर्यंत दिल्लीमधून सर्व बोलणी होतील. त्यानंतर 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *