Sunday , June 7 2026
Breaking News

महाविकास आघाडीचे राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी पत्र

Spread the love

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, छगन भूजबळ आणि नाना पटोलेंनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधानसभेचं रिक्त असलेलं अध्यक्षपद आणि विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या मुद्यांवरून ही भेट झाली असून, यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. ते अध्यक्षपदावर नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. हिवाळी अधिवेशनात सरकारने अध्यक्ष निवडणुकीची तारीख द्यावी म्हणून विनंती केली. पुन्हा अर्थसंकलपीय अधिवेशनात अध्यक्ष पद निवडणूक घ्यावे याबाबत 23 फेब्रुवारी रोजी प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी द्यावी यासाठीचं पत्र राज्यपालांना देण्यात आले.

मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, बहुमत सरकार असताना बारा आमदार राज्यपालांनी न्याय द्यावा त्यांना वंचित ठेवू नये विनंती केली. राज्यपाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, राज्यपाल जी तारीख देतील ती घेऊ असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी एक वर्ष हे पद रिकामं असल्याचं म्हणत याबाबत निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

Spread the love  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *