“बेळगाव कुणाच्या बापाच.., माझा बाप उद्धवस्त गिरणी कामगार.., जागर वेश्याचा…, बागलकोटची सुगंधा…, प्रेयसी एक आठवण…, लेक जगवा लेक शिकवा आणि व्यसनमुक्ती….” या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक श्री. अर्जुन विष्णू जाधव यांना शुक्रवार दि. ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मानाचा “साहित्य गौरव पुरस्कार..” हा देऊन सन्मानित ठाणे येथे करण्यात आले आहे.
ठाणे पत्रकार संघ व ठाणे साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन मुंबई आकाशवाणीचे कार्यकारी अधिकारी मा. श्री. अनिलकुमार पिंगळे, चित्रपट संगीतकार मा. श्री. रघुनाथ फडके इत्यादी मान्यवरांच्या हस्ते मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
…सतत बेळगाव सीमाप्रश्नवर केलेलं लेखन, समाजात जनजागृती व जन प्रबोधन, मूलभूत समस्यावर केलेलं लेखन याची दखल घेत “साहित्य गौरव पुरस्कार..” साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांना थाटामाटात प्रदान करण्यात आला आहे.