Monday , September 21 2026
Breaking News

पवारांचा आदेश अन् ठाकरे गट दोन पावले मागे! लोकसभेच्या जागा वाटपाचा मविआ फॉर्म्युला

Spread the love

 

मुंबई : लोकसभा आणि विधानसभेतील दुसर्‍या क्रमांकाच्या जागेवर येणार्‍या निवडणुकीत लक्ष द्या, असे स्पष्ट आदेश शरद पवारांनी दिलेत. अशातच लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर ठरल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं सुरुवातीला 20 जागांवर दावा करणारा ठाकरे गट दोन पऊलं मागं का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सुरुवातीला ठाकरे गटाकडून लोकसभेच्या वीस जागांवर दावा करण्यात आला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमिवर मविआची एक बैठकही पार पडली.
यावेळी लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काँग्रेस या फॉर्म्युल्यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. पण राऊत लोकसभेच्या जागावाटपाबाबत मोठा दावा केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *