Monday , September 21 2026
Breaking News

नागपूर-पुणे महामार्गावर बसची ट्रकला धडक; सात जण ठार

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात मंगळवारी नागपूर-पुणे महामार्गावर बसची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत 13 जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन वाहने अतिवेगाने जात असल्याने हा अपघात झाला. वेग जास्त असल्याने दोन्ही वाहनांचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघात होताच स्थानिकांनी मदतकार्यात जुंपले आणि अनेकांना बाहेर काढले. त्यांना नंतर रुग्णालयात नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *