Monday , September 21 2026
Breaking News

‘त्या’ 40 आमदारांना दोन आठवड्यांची मुदत

Spread the love

 

विधानसभा अध्यक्षांकडील सुनावणी लांबणार?

मुंबई : शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठीच्या कार्यवाहीला विलंब होत असल्याचं सांगत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत विधानसभा अध्यक्षांना आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. या सर्व घडामोडी घडत असताना एक महत्त्वाची अपडेट आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटांच्या आमदारांना म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. त्यानुसार काही आमदारांनी आपलं म्हणणंही मांडलं होतं. काहींचं म्हणणं मांडायचं बाकी होतं. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे ही सुनावणी लांबण्याची शक्यता आहे. हे आमदार आता काय उत्तर देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पावसाळी अधिवेशनामुळे मुदतवाढ

सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सर्व आमदार हे अधिवेशनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे म्हणणं मांडण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचं समजतं. त्यामुळे अध्यक्षांनी ही मुदतवाढ दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *