Monday , September 21 2026
Breaking News

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन

Spread the love

 

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले आहे. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सीमा देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. आनंद, जगाच्या पाठीवर, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलं. सीमा देव यांचे पती रमेश देव हे अभिनेते होते. त्यांचे 22 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले.

सीमा देव यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4.30 वाजता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अशोक सराफ यांनी व्यक्त केला शोक
अशोक सराफ यांनी बोलताना सांगितलं, ‘त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी अनेक वर्ष गाजवली. त्यांचा स्वभाव खूप छान होता. एक चांगली अभिनेत्री आपण आज गमावली आहे.’

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *