Monday , September 21 2026
Breaking News

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, चार राऊंड फायर झाल्याची माहिती

Spread the love

 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट निवासनाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर झाल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळाली आहे. पहाटेच्या सुमारास दोन जणांची दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची माहिती आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. तपासाअंती अधिक माहिती समोर येईल, सध्या पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास सुरु आहे.

अज्ञातांकडून चार राऊंड फायर
सलमान खान घराबाहेरील गोळीबारानंतर सीसीटीव्ही डीव्हीआर घेतला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पहाटे पाच वाजता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञानांकडून चार राउंड फायर केला. घटनास्थळी विविध पोलिसांची पथके या घटनेचा तपास करत आहेत. त्यात महत्त्वाचे असणारे सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि अज्ञातांचा तपास सुरू आहे.

याआधी चिठ्ठी आणि मेलद्वारे धमकी
यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना 2022 मध्ये एक चिठ्ठी द्वारे धमकी देण्यात आली होती. यामध्ये ‘मुसेवाला जैसा कर देंगे’, असं लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पिस्तूलचं लायसन्स देखील देण्यात आलं होतं. तसेच खाजगी सुरक्षारक्षकांमध्ये देखील वाढ करण्यात आली होती. नोव्हेंबर 2023 मध्येही धमकीचा ईमेल ही आला होता. त्यात पुन्हा आता गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *