Monday , April 20 2026
Breaking News

नाशिक-गुजरात हायवेवर खाजगी बस 200 फूट खोल दरीत कोसळली; 7 जण ठार

Spread the love

 

नाशिक-गुजरात हायवेवर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. सापुतारा घाटात हा अपघात झाला. एका खाजगी लक्झरी प्रवासी बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जण जागीच ठार झाले, तर 15 प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण की, बसचे घाटात कोसळल्यानंतर दोन तुकडे झाले. अपघातस्थळी आता मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या बसमधील प्रवासी नाशिकहून देवदर्शन आटोपून गुजरातकडे देवदर्शनासाठी चालले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी प्रवासी मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत.

क्रूझर गाडी कालव्यात कोसळली

कालच हरियाणामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा भीषण अपघात झाला होता. पंजाबमध्ये लग्न सोहळा आटोपून गावकरी घरी परतत असताना क्रूझर गाडी कालव्यात कोसळली. हा सुद्धा पहाटेच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर 10 बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु होता.

About Belgaum Varta

Check Also

ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात भीषण टक्कर; 11 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या!

Spread the love  मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *