Sunday , September 20 2026
Breaking News

सांगलीत माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार

Spread the love

 

सांगली : मागील महापालिका निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार समोर आले आहेत. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीत माजी मंत्री व आमदार जयंत पाटलांचे वडील दिवंगत राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकाराने सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचे वडील दिवंगत राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दिवंगत राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर काळा रंग फासून टाचण्या टोचण्यात आल्या आहेत. त्यावर लिंबू,केळी, असा उतारा करून रस्त्याच्याकडेला राजारामबापू यांचा फोटो टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे वाळवा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जयंत पाटील काय कारवाई करणार?
जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार केल्याने सांगतीलील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुरोगामी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतच ही घटना उघड झालीये. या प्रकारानंतर आमदार जयंत पाटील काय कारवाई करतात, हे पाहावे लागणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *