Monday , September 21 2026
Breaking News

मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल

Spread the love

पुणे : कडक उन्हामुळे सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे आतुरतेने वाट बघितली जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मान्सूनला देशात दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे २७ मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असा हवामान विभागाचा अंदाज हुकण्याची शक्यता होती. मात्र, मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने केरळात मान्सून २७ मे रोजी दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
केरळमध्ये २७ मे रोजी मान्सूनची सुरुवात अपेक्षित असून, यंदा ९९ टक्के पाऊस अपेक्षित आहे. पुढील ५ दिवसांत कोकण आणि गोवा प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. राज्याच्या इतर भागातही हलका पाऊस पडेल, अशी माहिती मुंबईचे आयएमडी प्रमुख जयंता सरकार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *