Sunday , September 20 2026
Breaking News

काँग्रेसकडून 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Spread the love

 

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 43 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसच्या आजच्या यादीत आसाम, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, दीव-दमण आणि राजस्थानच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये जालौर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आसामच्या जोऱ्हाट लोकसभा मतदारसंघातून गौरव गोगई यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या 43 उमेदवारांमध्ये 7 जनरल, 13 ओबीसी, 10 एससी, 9 एसटी आणि 1 मुस्लिम उमेदवाराचा समावेश आहे. काँग्रेसने राजस्थानच्या 25 जागांपैकी 10 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये बिकानेर येथून गोविंद मेघवाल, चुरु येथून राहुल कस्वा, झुंझुनू येथून बृजेंद्र ओला, अलवर येथून ललित यादव, भरतपूर येथून संजना जाटव. टोंक येथून हरीश मीणा, जोधपूर येथून करण सिंह उचियारडा, जालौर सिरोही येथून वैभव गहलोत, उदयपूर येथून ताराचंद मीणा, चितौड येथून उदयलाल आंजना यांचा समावेश आहे.

काँग्रेसने मध्यप्रदेशातील 10 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये छिंदवाडा येथून नकुलनाथ, भिंड येथून फूल सिंह बरैया, टीकमगढ येथून पंकच अहिरवार, सतना येथून सिद्धार्थ कुशवाह, सीधी येथून कमलेश्वर पटेल, मंडला येथून ओंकार सिंह मरकाम, देवास येथून राजेंद्र मालवीय, धार येथून राधेश्याम मुवेल, खरगोन येथून पोरलाल खरते, बैतूल येथून रामू टेकाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे कधी जाहीर होणार?
काँग्रेसने याआधीदेखील उमेदवारांची यादी जाहीर केलीय. तसेच आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पण यामध्ये एकाही महाराष्ट्राच्या उमेदवाराचा समावेश नाही. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे जोपर्यंत महाविकास आघाडीचं जागावाटप होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर होऊ शकणार नाहीत.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *